भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जात असलेल्या या मालिकेत सर्वांची नजर भारतीय संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यावर असेल. या सामन्यात विराट कोहली याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मैलाचा दगड पार करण्याची संधी असणार आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील पहिला सामना नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. विराट कोहली याच्याकडे या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी असणार आहे. नोव्हेंबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतक झळकावू शकला नाही. त्यामुळे या नव्या वर्षातील पहिल्याच कसोटी सामन्यात तो हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.
याव्यतिरिक्त त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा पूर्ण करण्याची देखील संधी असेल. यासाठी त्याला केवळ 64 धावांची गरज आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या तो शानदार फॉर्ममध्ये असून, हाच फॉर्म तो कसोटी क्रिकेटमध्ये कायम ठेवू इच्छितो. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ पाच असे फलंदाज आहेत, ज्यांनी हा आकडा पार केलाय. सध्या विराटने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 490 सामन्यांमध्ये 24,936 धावा केल्या आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 10,000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट हा एकमेव असा फलंदाज आहे, ज्याची सरासरी 50 पेक्षा जास्त दिसून येते.
भारताचा सचिन तेंडुलकर या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे. सचिनने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळताना 664 सामन्यात 34,357 धावा केल्या आहेत. त्यानंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा 28,016 धावांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग 27,483 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर पुन्हा श्रीलंकेचा माहेला जयवर्धने व दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस अनुक्रमे 25,957 व 25,534 धावांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.
(Virat Kohli needs 64 runs to complete 25,000 runs in International cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईट कॅमेरा ऍक्शन! कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचे फोटोशूट, नव्या जर्सीत खेळाडूंची धमाल
“अश्विनचा सामना करणे म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासारखे”, नंबर वन ऑस्ट्रेलियन फलंदाजाची कबुली