भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना बुधवारी (२ डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला जाईल. पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात पराभव झाल्याने भारतीय संघाने ही मालिका गमावली असून, अंतिम सामन्यात प्रतिष्ठा राखण्याच्या उद्देशाने भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. पहिल्या वनडे सामन्यात फलंदाजीत काही खास कामगिरी न केलेल्या कर्णधार विराट कोहलीने दुसर्या वनडेत ८९ धावांची शानदार खेळी खेळली. तिसऱ्या वनडेमध्ये भारताला विजय मिळवायचा असेल, तर विराटला पुन्हा एकदा अशीच खेळी करावी लागेल. विराट जेव्हा कॅनबेराच्या मैदानात उतरेल, तेव्हा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला एका विशिष्ट विक्रमात मागे सोडण्याची संधी त्याला असेल.
सर्वात वेगवान १२,००० धावांचा विक्रम करू शकतो आपल्या नावे
वनडे क्रिकेटमध्ये १२,००० धावा पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीला केवळ २३ धावांची गरज आहे. दुसर्या सामन्यातील त्याची फलंदाजी पाहता तो तिसर्या वनडे सामन्यात हा विशेष विक्रम आपल्या नावे करू शकतो. कोहलीने २३ धावा बनविल्या, तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज होईल. विराटने आतापर्यंत २५० वनडे सामन्यांमध्ये ११,९७७ धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२,००० धावांचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर असून, त्याने ३०९ सामन्यांच्या ३०० डावांमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या होत्या.
१२,००० धावा करणारा ठरू शकतो सहावा फलंदाज
उद्या विराटने २३ धावा काढल्या, तर वनडे क्रिकेटमध्ये १२,००० धावा बनविणारा तो सहावा फलंदाज ठरेल. यापूर्वी, सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, महेला जयवर्धने, कुमार संगकारा व सनथ जयसूर्या यांनी वनडे क्रिकेटमध्ये १२,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने दुसऱ्या वनडेतील खेळीने आपण फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले होते. भारताला अखेरच्या सामन्यात आपली प्रतिष्ठा राखायची असेल, तर विराटला एक शानदार खेळी करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
शाहरुख खानने विकत घेतला आणखी एक टी२० संघ, ‘या’ लीगमध्ये घेणार भाग
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ