भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत समोर येणारे आव्हाने पार करत वेगाने पुढे जात आहे. भारताने विश्वचषकाचा 37वा आणि वैयक्तिक आठवा सामना जिंकला. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात आधी भारताच्या फलंदाजांनी आणि नंतर गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. मात्र, सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला शतकवीर विराट कोहली. विराटने सामन्याच्या दिवशीच 35व्या वयात पदार्पण केले. हा दिवस त्याच्यासाठी खासही ठरला. त्याने सामन्यानंतर सचिन तेंडुलकर याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
काय म्हणाला विराट?
विराट कोहली (Virat Kohli) याने शतक झळकावत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्यानंतर विराटला सचिनविषयी प्रश्न विचारला गेला, ज्यावर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली. यावेळी तो भावूक झाल्याचे व्हिडिओत दिसते.
विराट म्हणाला, “हा स्पर्धेतील सर्वात कठीण संघ होता. मला फक्त चांगले प्रदर्शन करायचे होते. वाढदिवशी चांगली खेळी निघाली, त्यामुळे हे आणखी खास ठरले. सामन्यादरम्यान मला आणखी चांगले करायचे होते, पण जसा चेंडू जुना झाला, खेळपट्टीही संथ होत गेली. त्यामुळे मला योजनेत बदल करावा लागला.”
सचिनच्या विक्रमाविषयी बोलताना विराट म्हणाला, “मला आनंद आहे की, मी माझे काम करू शकलो. मला विक्रम नाही, फक्त धावा करायच्या आहेत. मला आनंद आहे की, पुन्हा एकदा मी हे काम करू शकलो. सचिनची बरोबरी खूप मोठी बाब आहे. तो माझा हिरो आहे. मला माहितीये की, लोक तुलना करतात, पण त्यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही. ते माझे हिरो होते आणि नेहमी राहतील. मला आठवते की, जिथे बसून मी त्यांना टीव्हीवर पाहायचो, आता त्याच ठिकाणी पोहोचून भावूक झालो आहे.”
View this post on Instagram
विराटची सामन्यातील कामगिरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने 121 चेंडूंचा सामना करताना नाबाद 101 धावा केल्या. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 10 चौकारही निघाले. यासह विराटचे वनडेतील 49वे शतक पूर्ण झाले. सचिन तेंडुलकरनेही वनडेत 49 शतके झळकावली आहेत. त्यामुळे आता वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम संयुक्तरीत्या विराट आणि सचिनच्या नावे आहे. (virat kohli on sachin tendulkar after india won against south africa world cup 2023 see video)
हेही वाचा-
लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विराट आणि श्रेयस…’
पाच बळी घेऊनही सामनावीर न ठरल्यानंतर जडेजा म्हणाला, ” या खेळपट्टीवर तुम्ही…”