भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीची पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसोबत अनेकदा तुलना केली जाते. एकीकडे विराट मागच्या मोठ्या काळापासून त्याचे अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये, तर दुसरीकडे बाबर मात्र कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आता या दोघांपैकी एकाला सध्याचा सर्वोत्तम फलंदाज निवडले आहे.
दिग्गज डेल स्टेन (Dale Steyn) मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच स्टेन त्याच्या ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये तीन प्रकारांमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? यावर अनेकदा चर्चा होत असते. काही क्रिकेट पंडित विराट कोहली (Virat Kohli) हे नाव घेत या प्रश्नाचे उत्तर देतात, तर काही बाबर आझम (Babar Azam) याचे नाव घेतात. काहींचे उत्तर रोहित शर्मा, स्टीव्ह स्मिथ आणि यापेक्षा वेगळे देखील असते.
स्टेनला ट्विटरवरील प्रश्न उत्तराच्या सत्रात एका चाहत्याने प्रन्न विचारला की, “तुझ्या मते सध्याच्या परिस्थितीत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण आहे?” या प्रश्नाचे उत्तर देताना स्टेन म्हणाला की, “शक्यतो बाबर, तो खूपच अप्रतिम आहे.” स्टेनने दिलेल्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहते चांगलेच संतापलेले दिसत आहेत. विराट आणि बाबर आझमच्या चाहत्यांमध्ये ट्वीटवर वाद सुरू झाल्याचेही पाहायला मिळाले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, विराटची लोकप्रियता भारतात जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. एक वेळ सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी दावेदार असलेल्या विराट कोहलीला २०१९ नंतर एकही शतक करता आलेले नाहीये. बांगलादेशविरुद्ध गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात विराटने शेवटचे शतक केले होते. त्यानंतर आजतागायत चाहते त्याच्या पुढच्या शतकाची वाट पाहत आहेत. विराटच्या तुलनेत बाबरचा अनुभव नक्कीच कमी आहे, पण तो पाकिस्तान संघासाठी फलंदाज आणि कर्णधाराच्या रूपात नेहमीच यशस्वी ठरत आला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माजी भारतीय क्रिकेटरच्या मते ‘हा’ आहे आशियातील सर्वश्रेष्ठ खेळाडू, तर आझमला दिलीय दुसरी पसंती
जो रुटने तर नेतृत्व सोडले, आता कोण होणार इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार? ‘हे’ आहेत चार पर्याय
एकच तर हृदय आहे, कितीदा जिंकशील! चौकार मारल्यानंतर हार्दिकने गोलंदाज प्रसिद्धची मागितली क्षमा