Loading...

विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ कोण आहे सर्वोत्तम? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गाजाने दिले ‘हे’ उत्तर

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ यांची नेहमीच एकमेकांबरोबर तुलना होत असते. याबद्दल अनेक दिग्गजांनी याआधीही मते मांडली आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू डिन जोन्स यांनी विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे.

एका चाहत्याने जोन्स यांना ट्विटरवर प्रश्न विचारला की स्मिथ आणि विराटमधील त्यांच्यामते कोण सर्वोत्तम खेळाडू आहे. यावर उत्तर देताना जोन्स यांनी विराटचे नाव घेतले आहे. त्यांनी ट्विट केले की ‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये विराट कोहली.’

नुकतेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत विराट आणि स्मिथ या दोघांनीही आपापल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. विराटने 2 अर्धशतकांसह 61 च्या सरासरीने 183 धावा केल्या. तर स्मिथने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 114.50 च्या सरासरीने 229 धावा केल्या.

तसेच सध्या कसोटी क्रमवारीत विराट अव्वल क्रमांकावर, तर स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर वनडे क्रमवारीत विराट अव्वल क्रमांकावर आहे. तसेच स्मिथ 23 व्या क्रमांकावर आहे.

Loading...
You might also like
Loading...