भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ यांची नेहमीच एकमेकांबरोबर तुलना होत असते. याबद्दल अनेक दिग्गजांनी याआधीही मते मांडली आहेत.
आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही विराट आणि स्मिथमधील सर्वोत्तम फलंदाज कोण असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र सचिनने त्या दोघांमध्ये तुलना करण्यासाठी नकार दिला. तसेच म्हटले की दोघांनाही फलंदाजी करताना बघायला मजा येते.
सचिन बुशफायर क्रिकेट बॅश या चॅरिटी सामन्यासाठी रिकी पाँटिंग एकादश संघाचा प्रशिक्षक असल्याने सध्या सिडनीमध्ये आहे. यावेळी बोलताना सचिन म्हणाला, ‘मला तुलना करायला आवडत नाही. लोकांनी माझीही अनेकांशी तुलना केली. पण मला वाटते खेळाडूंना त्यांचा खेळ करु द्यावा.’
तसेच स्मिथ आणि विराटबद्दल सचिन म्हणाला, ‘आपण तुलना करायला नको. आपण ते दोघेही(विराट आणि स्मिथ) वैयक्तिकरित्या जे करत आहेत, त्याचा आनंद घेऊ या. ते सध्या संपूर्ण क्रिकेट जगताचे मनोरंजन करत आहेत आणि त्यांना पहाणे ही आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे.’
तसेच यावेळी सचिनने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेनचेही कौतुक केले. तो म्हणाला, ‘इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात मी मार्नसला खेळताना पाहिले. जखमी स्मिथच्या जागेवर तो खेळला. त्यावेळी त्याला जेव्हा जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला आणि त्यानंतरही त्याने 15 मिनिटे फलंदाजी केली. ते पाहून मला वाटले तो एक खास फलंदाज आहे.’
‘त्याचे फूटवर्क अद्भुत आहे. फुटवर्क हे मानसिक स्थितीशी संबंधित आहे. कारण जर आपण सकारात्मक दृष्टीकोनातून खेळत नसू तर आपल्या पायाच्या हालचालींवर परिणाम होतो.’
भारताचे टेंशन वाढणार; दुसऱ्या वनडेत करावा लागणार ६ फूट ८ इंचावरुन येणाऱ्या चेंडूचा सामना
वाचा????https://t.co/JNJwxs3V3p????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना होणार 'या' संघाशी
वाचा????https://t.co/NIGws3UZUk????#म #मराठी #Cricket #TeamIndia #U19CWC— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020