मुंबई। शुक्रवारपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वानखेडे स्टेडियमवर कसोटी मालिकेचा दुसरा आणि अखेरचा सामना पार पडणार आहे. मालिका विजयाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे.
विराटची सरावाला सुरुवात
विराटला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेसाठी आणि कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. यानंतर आता भारताचा कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे तो मुंबईत होणाऱ्या कसोटीसाठी पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमीकेत दिसेल.
विराट मुंबई कसोटीसाठी भारतीय संघात सामील झाला असून त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. त्याच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये पावसामुळे इनडोअर सराव करताना विराट दिसत आहे. यात तो नेटमध्ये फलंदाजी सराव करताना दिसतो. एवढेच नाही, तर प्रशिक्षक राहुल द्रविडच्या गोलंदाजीवरही सराव करताना दिसत आहे.
विराट कोहली आणि राहुल द्रविड यांची जोडी कर्णधार-प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदाच एकत्र आली आहे.
???? ???? Sound ????
6⃣0⃣ Seconds of Pure Joy! ???? ????
V.I.R.A.T K.O.H.L.I takes centre stage ????????#TeamIndia | #INDvNZ | @imVkohli | @Paytm pic.twitter.com/SadmhCvQYz
— BCCI (@BCCI) December 2, 2021
मयंक जाणार बाहेर?
विराटचे पुनरागमन झाले असल्याने अंतिम ११ जणांच्या संघात एका फलंदाजाला विराटसाठी जागा रिकामी करावी लागणार आहे. यासाठी मयंक अगरवालचं नाव पुढे येत आहे. तो कानपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता.
पावसाचे सावट
दरम्यान, मुंबई कसोटीवर पावसाचे सावट आहे. पहिल्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय येणे जवळपास नक्की आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत–न्यूझीलंड दुसरी कसोटी? जाणून घ्या एका क्लिकवर
दुसऱ्या कसोटीत पाऊस बिघडवणार भारत-न्यूझीलंडचा खेळ? पाहा कसे असेल मुंबईचे हवामान
कडक!! नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर फलंदाज क्लीन बोल्ड; ४ ते ५ फूट लांब उडला स्टंप