जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. येत्या १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील. पहिल्यांदाच आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकावणार, याकडे क्रिकेट जगताचे आता लक्ष लागून राहिले आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघ ३ जून रोजीच इंग्लंडमध्ये दाखल झाला. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमावली अंतर्गत सगळया भारतीय खेळाडूंनी विलगीकरणचा निर्धारित कालावधी देखील पूर्ण केला. त्यानंतर आता त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. अशाच एका सरावाचा व्हिडिओ आता समोर आला असून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपले फलंदाजी कौशल्य पडताळून घेत आहे.
कोहलीचा कसून सराव
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीसाठी आगामी अंतिम सामना एक महात्वाकांक्षी मोहीम आहे. कोहलीने कर्णधारपद हाती घेतल्यापासून नेहमीच कसोटी क्रिकेटला सर्वोच्च महत्व दिले आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च किताब पटकावण्याचे त्याचे ध्येय असेल. त्याचीच तयारी म्हणून तो साउथम्पटनच्या मैदानावर जय्यत सराव करतांना दिसून आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसीने कोहलीच्या सरावाचा हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला. या व्हिडिओत भारतीय कर्णधार विविध ड्राइव्ह्जचा सराव करतांना दिसून येतो आहे. याच अर्थाचे कॅप्शन देखील आयसीसीने या व्हिडिओला दिले आहे. ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी आपले ड्राइव्ह्ज तपासून लयीत आणतांना विराट कोहली’, असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.
https://www.instagram.com/p/CQBKazaB7VY/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
भारतीय संघाचा कसून सराव
दरम्यान, कोहलीसह सगळेच भारतीय खेळाडू या अंतिम सामन्याची जय्यत तयारी करतांना दिसत आहे. साउथम्पटनच्या मैदानावर भारतीय संघाने आपल्यातच दोन संघ करत एक ‘इंट्रा-स्क्वाड’ सामना देखील खेळला. या सामन्यात सगळेच खेळाडू घाम गाळताना दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या:
चहल करणार ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूचा सामना, मात्र क्रिकेट नाही तर चक्क बुद्धिबळाच्या पटावर
Video: पाकिस्तानी गोलंदाजाचा सामना करताना आंद्रे रसल जखमी; स्ट्रेचरवरुन न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये