आज(१२ जुलै) वेस्ट इंडिजने इंग्लंड विरुद्ध साऊथँम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयात जर्मेन ब्लॅकवूडने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात ९५ धावांची खेळी केली आहे.
वेस्ट इंडिजच्या या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिज संघाचे कौतुक केले आहे. त्याने ट्विट केला की ‘वाह! वेस्ट इंडिज काय मस्त विजय होता. अव्वल दर्जाचे कसोटी क्रिकेट’
Wow @windiescricket what a win. Top display of test cricket.
— Virat Kohli (@imVkohli) July 12, 2020
या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्लॅकवूडला रोस्टन चेस(३७), शेन डावरिच(२०) आणि कर्णधार जेसन होल्डरने (१४*) शानदार साथ दिली. ब्लॅकवूडने १५४ चेंडूत १२ चौकारांसह ९५ धावा केल्या.
ब्लॅकवूड आणि चेसमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली, तर ब्लॅकवूड आणि डावरिचमध्ये ६८ धावांची भागीदारी झाली. या दोन्ही भागीदाऱ्या वेस्ट इंडिजच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
या सामन्याने जवळजवळ ४ महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. मागील ४ महिने कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्थगित झाले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडवर वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय
जोफ्रा आर्चरच्या खतरनाक चेंडूवर हा फलंदाज झाला घायाळ; तुटला अंगठा?
सौराष्ट्राला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार ‘या’ संघाकडून