नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशात भारतात कामगारांसाठी अनेकजण मदतीचा हात देत आहेत. यामध्ये एका क्रिकेट संघाचाही समावेश आहे. दिल्लीमध्ये हौशी क्रिकेट खेळणाऱ्या उत्तराखंडच्या एका संघाने लॉकडाऊनमुळे समस्या निर्माण झालेल्या प्रवाश्यांची मदत करून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपला चाहता बनवले आहे.
‘उत्तराखंड पँथर्स’ (Uttarakhand Panthers) नामक संघाच्या सदस्यांनी एकत्र येत गाझियाबादमध्ये आपल्या घरी परतणाऱ्या हजारो प्रवाश्यांसाठी ३ दिवसापर्यंत जेवण आणि पाण्याची सोय केली. त्यानंतर विराटने (Virat Kohli) एक व्हिडिओ मेसेज पाठवून त्यांचा प्रोत्साहन दिले.
https://twitter.com/virat_always/status/1262766123734331392
विराटने आपल्या मेसेजमध्ये म्हटले की, “नमस्कार ‘उत्तराखंड पँथर्स.’ मी माझ्या ओळखीच्या व्यक्तींकडून तुमचे फोटो पाहिले. तुम्ही यादरम्यान खूप चांगले काम करत आहात. इतरांची मदत करण्यापेक्षा मोठे कोणतेच काम नाही. ज्या उत्कटतेने तुम्ही हे काम करत आहात ते पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी अशी प्रार्थना करेल की, तुम्हाला असे काम करण्याची शक्ती मिळो. संपूर्ण मेहनतीने तुम्ही हे काम करत रहा.”
अनुष्काला पाठवले होते फोटो-
विराटचा मेसेज आल्यामुळे ‘उत्तराखंड पँथर्स’ संघ खूप उत्साहित आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी पूर्ण संघाला एकत्र आणणाऱ्या नरेंद्र नेगीने (Narendra Negi) म्हटले की, त्याच्या एका मित्राने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला हे फोटो पाठविले होते. तो म्हणाला की, माझा एक मित्र आहे आणि तो अनुष्का शर्माला (Anushka Sharma) ओळखतो. त्याने अनुष्का शर्मा आणि विराटला फोटो पाठविले होते. त्यानंतर विराटने आमच्यासाठी व्हिडिओ मेसेज पाठविला होता.
नेगीने म्हटले की, आमचा एक क्रिकेट संघ आहे ज्यामध्ये उत्तराखंडच्या प्रवाश्यांचाही समावेश आहे. आम्ही स्थानिक स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेतो. लॉकडाऊनच्या (Lockdown) दिवसांमध्ये एक दिवस मी औषध घेण्यासाठी वैशाली येथे गेलो असता मी पाहिले की, लोक विना अन्नपाण्याचे आपल्या घरी चालत जात आहेत. त्यानंतर आमच्या संघाने त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला.
“आम्हाला पोलिसांनी सांगितले की, हजारो मजुरांना पालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. आम्ही सर्व मित्रांनी पैसे गोळा केले. तसेच काही स्थानिक लोकांनीही आमची मदत केली. आम्ही शाळेत राहणाऱ्या लोकांसाठी ३ दिवसापर्यंत खाण्यापिण्याची व्यवस्था केली. यामध्ये आम्ही आचाऱ्याची मदत घेतली होती,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हसीन जहाँने डांन्स करत दिल्या ईदच्या शुभेच्छा, तर मोहम्मद शमी केला खास ट्विट
-सानिया मिर्झा म्हणते, शोएब मलिकची ही गोष्ट अजिबात आवडत नाही
-टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू होऊ शकतो भविष्यात चांगला समालोचक