भारतात गेल्या दोन महिन्यांपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात क्रिकेट मालिका सुरु होत्या. या मालिका आता संपल्या असल्याने सर्वांनाच इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाची सर्वांनाच आतुरता लागली आहे. या हंगामासाठी प्रत्येक संघात त्यांचे जवळपास सर्व खेळाडू दाखल झाले आहेत. गुरुवारी (१ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीही चेन्नईला पोहचला आहे.
विराटला व्हावे लागणार ७ दिवस क्वारंटाईन
आयपीएलचा १४ वा हंगाम हा कोरोना व्हायरलच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने बीसीसीआयने काही कडक नियम केले आहेत. त्यानुसार संघांत दाखल होण्यापूर्वी खेळाडूंना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन राहावे लागणार आहे. या नियमातून फक्त त्याच खेळाडूंना सुट देण्यात आली आहे, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून थेट आपल्या आयपीएल संघात दाखल होणार आहेत. कारण ते आंतरराष्ट्रीय मालिका खेळत असल्याने आधीच बायो बबलमध्ये असतील.
त्यानुसार भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या वनडे मालिकेत खेळलेल्या खेळाडूंनाही क्वारंटाईनमधून सुट देण्यात आली होती. मात्र, विराट ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघाचे बायोबबल तोडून घरी परतला होता. त्यामुळे आता त्याला आरसीबीच्या संघात दाखल होण्यापूर्वी ७ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे अनिवार्य असेल.
विराट चेन्नईत दाखल –
विराट १ एप्रिलला चेन्नईला पोहचला आहे. याबद्दल आरसीबी संघाने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी विराटचा चेन्नईला पोहचल्याचा फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन लिहिले आहे की ‘जर आपल्याला वाटत असेल की दिवसासाठी आम्ही इंटरनेट खंडित केले तर पुन्हा विचार करा! कर्णधार कोहली चेन्नईला पोहचला आहे.’ या फोटोमध्ये विराटने मास्क लावलेले दिसत आहे.
If you thought we were done breaking the internet for the day, think again! 😎
Captain Virat Kohli 👑 has arrived in Chennai 🤩#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/p1BS81eChE
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 1, 2021
आरसीबीचा प्रमुख फलंदाज एबी डिविलियर्स देखील ३१ मार्चला चेन्नईमध्ये पोहचला आहे. तो देखील ७ दिवसांसाठी क्वारंटाईन होईल. त्यानंतरच संघात सामील होईल. सध्या चेन्नईमध्ये आरसीबीचे सराव शिबिर सुरु झाले आहे.
BREAKING THE INTERNET :
The spaceship has landed! 🚀
AB de Villiers has joined the RCB bubble in Chennai. 👽#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #AllInForAB pic.twitter.com/pnvXGVl8ww
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 1, 2021
बेंगलोरची मोहिम चेन्नईतून
आयपीएल २०२१ चे आयोजन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने ते थोडे वेगळ्याप्रकारे करण्यात आले आहे. यंदा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळाच प्रवास करेल अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संघ यंदा आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे बेंगलोरची आयपीएल २०२१ची मोहिम यंदा चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममधून सुरु होईल. बेंगलोरचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध ९ एप्रिलला होणार आहे. बेंगलोर साखळी फेरीतील पहिले ३ सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यानंतरचे त्यांचे साखळी फेरीतील २ सामने मुंबईत, ४ सामने अहमदाबादला आणि ५ सामने कोलकाता येथे होणार आहेत.
असे आहेत आयपीएल २०२१ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे साखळी फेरीतील सामने-
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७० वाजता
१४ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल- चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी ३.३० वाजता
२२ एप्रिल – मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२७ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३० एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
६ मे – अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – कोलकाता, राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहासातील ‘हे’ पाच क्षण चाहते कधीही नाही विसरणार