आज संपूर्ण भारतात 73 वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या स्वातंत्र्य दिवसानिमित्त भारतीय क्रिकेटपटूंनी देशवासियांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केदार जाधव, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव हे भारतीय क्रिकेटपटू स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना दिसले आहेत. विराटने शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘हा आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठेचा दिवस’.
तसेच केदारने स्वातंत्र्यदिनाच्या मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या, तर कुलदीप यादवने हिंदीतून शुभेच्छा दिल्या. याबरोबरच भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही शुभेच्छा देताना दिसून आले.
ह्या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की ‘भारतीय संघ सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहे. जय हिंद.’
#TeamIndia wishes everyone a very Happy Independence Day
Jai Hind 🇮🇳#IndependenceDay pic.twitter.com/z2Ji00T2l0
— BCCI (@BCCI) August 14, 2019
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल(14 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवून तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशी जिंकली. या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने घातली होती खास जर्सी
–व्हिडिओ: अनेकांनी गेलला दिला निरोप; मात्र गेल म्हणाला, ‘मी अजून निवृत्त झालोच नाही’
–असा पराक्रम करणारा श्रेयस अय्यर युवराजनंतरचा दुसराच भारतीय!