भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२५-२६साठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये भारतीय पुरूष संघातील ३० खेळाडूंंचा सहभाग आहे. संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे बीसीसीआय २०२५-२६च्या केंद्रीय करारामधून डिमोशन झाले आहे. आतापर्यंत हे दोघेही A+ श्रेणीमध्ये होते, मात्र टी२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतल्याने दोघांना नुकसान झाले आहे.
तसेच बीसीसीआयने A+ श्रेणीही रद्द केली आहे. त्यामुळे आता करारामध्ये केवळ तीन श्रेणी आहेत. त्यातील अ (A) मध्ये भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजादेखील आहेत. जडेजाने आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेतली आहे.
रोहित आणि कोहलीचा समावेश आता ब (B) श्रेणीमध्ये आहे. यामध्ये भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जायसवाल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू आहेत.
त्याचबरोबर क (C) श्रेणीमध्ये अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिश्नोई आणि रुतुराज गायकवाड हे खेळाडू आहेत.
मागील करारानुसार, A+मध्ये असलेल्या खेळाडूंचे वार्षिक उत्पन्न ७ कोटी, A श्रेणीसाठी ५ कोटी, B श्रेणीसाठी ३ कोटी आणि C श्रेणीसाठी एक कोटी रूपये होते. सध्यातरी नव्या करारानुसार उत्पन्न ठरलेले नाही.
बीसीसीआय केंद्रीय करार २०२५-२६–
A – शुबमन गिल, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा
B- रोहित शर्मा , विराट कोहली, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर.
C – अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिश्नोई, रुतुराज गायकवाड.






