fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

फक्त ‘या’ आणि ‘याच’ खेळाडूमुळे विराट झाला टीम इंडियाचा कर्णधार

मुंबई । भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर देण्यात आली. विराट कोहली आज जागतिक क्रिकेटमध्ये एक आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली.

कोहली भारतीय संघाचा कर्णधार कसा झाला याचा खुलासा शनिवारी केला. फिरकीपटू आर. अश्विन यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर बोलताना कोहली म्हणाला, मी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सहा वर्षे खेळलो. यामुळेच मला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मला मिळाली.

मला कर्णधार करण्यापाठीमागे धोनीचा मोठा हात आहे. मैदानात मी नेहमी त्याच्या बाजूला उभे रहायचो. सामना सुरू असताना धोनी नेहमी माझ्याबरोबर सतत बोलत रहायचा. माझ्यातील आत्मविश्वास वाढत गेला. त्यानंतर धोनीला वाटू लागले की, मी भारतीय संघाचं नेतृत्व करू शकतो. त्यानंतर त्याने माझ्या नावाची शिफारस केली.

भारतीय संघाचा कर्णधार होईल असे मला स्वप्नातदेखील कधी वाटले नव्हते असे कोहली म्हणाला.

You might also like