विराटने शेअर केला धोनीबरोबरील खास फोटो; २ तासात मिळाल्या ११ लाखांपेक्षा अधिक लाईक्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीबरोबरचा 2016 टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर कला आहे.

विराटने शेअर केलेला हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला इंस्टाग्रामवर 2 तासात तब्बल 11 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. तर ट्विटरवर 5 हजारांपेक्षा अधिक रिट्विट आणि 34 हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आल्या आहेत.

विराटने या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘हा सामना मी कधीही विसरु शकत नाही. खास रात्र होती. या व्यक्तीने(धोनीने) मला फिटनेस टेस्ट प्रमाणे धावायला लावले होते.’

हा फोटो धोनीने या सामन्यात विजयी चौकार ठोकल्यानंतर विराट भावनिक होऊन गुडघ्यांवर बसला होता, त्या क्षणाचा आहे.

या सामन्यात विराट सामनावीर ठरला होता. त्याने 51 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले होते.

भारताने या सामन्यात विजयासाठी 161 धावांचा पाठलाग करताना पहिल्या तीन विकेट्स 8 षटकांच्या आतच 49 धावांवर गमावल्या होत्या. पण नंतर विराटने चौथ्या विकेटसाठी युवराज सिंगबरोबर 45 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला होता. पण युवराजही 21 धावा करुन बाद झाला.

त्यानंतर विराटने त्यावेळीचा भारताचा कर्णधार धोनीबरोबर नाबाद 67 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

या सामन्यात विराटने 19 व्या षटकात नॅथन कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर 4 चौकार मारत भारताला विजयाच्या समीप आणले होते. त्यानंतर 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने  चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. धोनीने या सामन्यात 10 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या होत्या.

या टी20 विश्वचषकात नंतर भारताला उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने पराभूत केले होते. त्यामुळे भारताचे आव्हान उपांत्य सामन्यानंतर संपूष्टात आले होते. नंतर वेस्ट इंडीजने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

दिल्लीच्या या युवकाने असा केला २०१९ चा वर्ल्डकप अविस्मरणीय, पहा व्हिडिओ

पाचव्या ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या खेळाडूला मिळाली संधी

शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ; या मोठ्या खेळाडूला वगळले

You might also like