भारत विरुद्ध न्यूझीलंड ( INDvNZ ) यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा सोमवारी (६ डिसेंबर) शेवट झाला. या सामन्यात भारताने ३७२ धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय खेळाडूंनी या संपूर्ण सामन्यात अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. भारतीय संघाने या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर कसोटी मालिका देखील १-० अशा फरकाने जिंकली. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) याने या सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे, चाहत्यांची मने जिंकली. विराटने यावेळी भारतीय संघाच्या भविष्याविषयी एक महत्वाची गोष्ट बोलून दाखवली. सोबतच विराटने कानपूरमधील कसोटी सामन्याविषयीचे मत सांगितले.
सोमवारी दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराटने त्याची खास प्रतिक्रिया दिली. तो यावेळी म्हणाला की, “कानपूरमध्ये न्यूझीलंड संघाने सामना अनिर्णीत केला. त्याठिकाणी खेळपट्टी पाचव्या दिवसासारखी वाटत नव्हती. मात्र, गोलंदाजांनी पूर्ण प्रयत्न केला. याठिकाणी चांगली खेळपट्टी होती. ज्यामुळे गोलंदाजांना त्यांचे काम करण्यामध्ये कसलीही अडचण आली नाही. आम्ही सर्वजण देशाची सेवा करत आहोत. अगोदर रवी भाई होते, आता राहुल भाई आहेत.”
विराटच्या म्हणण्याप्रमाणे संघ नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “आम्ही नवीन नेतृत्व तयार करू इच्छितो. आम्हाला असे खेळाडू बनवायचे आहेत, जे पुढे येऊन त्यांचे काम करतील. उद्या मी कर्णधार राहणार नाही, उद्या राहुल भाई प्रशिक्षक राहणार नाहीत. पण आमचे लक्ष हेच आहे की, भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर पोहचवायचे.”
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारताने विजय मिळवला आहे आणि संघ येणाऱ्या पुढच्या आव्हानासाठी तयार आहे. भारतीय संघाला याच महिन्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्याविषयी बोलताना विराट म्हणाला की, “आम्ही दक्षिण अफ्रिकेत मागच्या वेळी चांगले प्रदर्शन केले होते. विदेशात आम्ही मागच्या काही वर्षात चांगले प्रदर्शन करत आलो आहोत. आता संधी आहे की, दक्षिण अफ्रिकेत एक चांगले क्रिकेट खेळले जावे.”
कोविडच्या पार्श्वभूमीवर भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) होणार का? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीसीआय व क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने यावर तोडगा काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ दिग्गज म्हणतोय, “भारतीय क्रिकेट म्हणजे गुणवान खेळाडूंची फॅक्टरी”
आता टिकाकारांची बसणार दातखिळी! ‘आऊट ऑफ फॉर्म’ हार्दिकने फिटनेसवर सुरू केलंय काम- Video
नोव्हेंबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, एकाही भारतीयाचं मात्र नाव नाही