fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटी क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, जाणून घ्या अन्य भारतीय खेळाडूंची क्रमावारी

1 ऑगस्ट पासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 71 वी ऍशेज मालिका सुरु होत आहे. या मालिकेने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपला देखील सुरुवात होणार आहे. त्याआधी आयीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर कायम आहे.

विराटचे 922 गुण आहेत. तसेच त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 881 गुणांसह चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कसोटी क्रमवारी विराट आणि पुजारा व्यतिरिक्त पहिल्या फलंदाजांमध्ये अन्य भारतीय फलंदाज नाही. त्यांच्यानंतर थेट 15 व्या क्रमांकावर रिषभ पंत आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. तिसऱ्या क्रमांकावर कागिसो रबाडा आहे.

तसेच पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये रविंद्र जडेजा आणि आर अश्विन हे दोनच भारतीय फिरकीपटू आहेत. जडेजा सहाव्या तर आश्विन 10 व्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर विंडीजचा जेसन होल्डर असून बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या क्रमांकावर आणि भारताचा जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीतही पहिल्या 10 खेळाडूंमध्ये जडेजा आणि अश्विन हे दोघेच भारतीय आहेत. अश्विन या क्रमावरीत 6 व्या क्रमांकावर आहे.

संघ क्रमवारीत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर कायम असून न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आर अश्विन पुन्हा चर्चेत, गोलंदाजी ऍक्शन बदलत केले फलंदाजाला बाद, पहा व्हिडिओ

विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार होता धोनी, पण विराटने त्याला थांबवले?

चांगल्या कामगिरीनंतरही टीम इंडियात निवड न झाल्याने हा खेळाडू झाला निराश

You might also like