भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (15 जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितने भारतासाठी डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली. पण त्याच्या विकेटनंतर खेळण्यासाठी खेळपट्टीवर आलेल्या विराटने देखील अप्रतिम प्रदर्शन केले. विराट कोहली या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत सामील झाला.
विराट कोहली () श्रीलंकेविरुद्धच्या या शेवटच्या वनडे सामन्यात 48 चेंडूत अर्धशतक केले, तर 89 चेंडूत शतक पूर्ण केले. विराट या शतकीय खेळीच्या जोरावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या पाच फलंदाजांमध्ये सामील जाला आहे. त्याच्या या खेळीनंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज माहेला जयर्धने याला नुकसान सोसावे लागले. भारताने विराट कोहली आणि शुबमन गिल () यांच्या वादली खेळीच्या जोरावर या सामन्यात 390 धावा साकारल्या.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिला क्रमांक भारताचा महान फलंदजा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत 452 वनडे डावांमध्ये 18426 धावा साकारल्या. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara) आहे, ज्याने 380 वनडे डावांमध्ये 14234 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियान दिग्गज रिकी पाँटिंग (Rickey Ponting) आहे, ज्याने 13704 (433 वनडे डावांमध्ये) धावा केल्या आहेत. यादीत चौथा क्रमांक सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आहेत, ज्यांनी 433 डावांमध्ये 13430 वनडे धावा केल्या. विराट आता या दिग्गजांच्या यादीत नव्याने जोडला गेला आहे. विराटने अवघ्या 259 डावांमध्ये 12651 वनडे धावा केल्या आहेत. माहेला जयवर्धने () याच्या नावावर वनडे क्रिकेमटध्ये
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – 18426 (452 डाव)
कुमार संगकारा – 14234 (380 डाव)
रिकी पाँटिंग -13704 (365 डाव)
सनथ जयसूर्या – 13430 (433 डाव)
विराट कोहली – 12754* (259 डाव)
माहेला जयवर्धने – 12650 (418 डाव)
(Virat Kohli surpasses Mahela Jayawardene in terms of highest ODI runs)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी
INDvSL: शुबमन गिलच्या शतकाआधी युवराज सिंगने म्हटले, ‘क्रिकेट मरतय का?’; जाणून घ्या कारण