Loading...

व्हिडिओ: ‘सुपरमॅन’ विराट कोहलीचा हा अफलातून झेल पाहिला का?

तिरुअनंतरपुरम। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(8 डिसेंबर) दुसरा टी20 सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला.

Loading...

या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीने बाउंड्री लाइन जवळ शिमरॉन हेटमायरच्या घेतलेल्या झेलची बरीच चर्चा झाली.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताच्या रविंद्र जडेजाने टाकलेल्या 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने पळत जाऊन शानदार झेल घेतला.

हेटमायरने जडेजाच्या या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता. त्याने चौथ्या चेंडूवरही तसाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण विराटने लाँगऑनवरुन उजवीकडे पळत येत दोन्ही हात पुढे लांब करत बाउंड्री लाईनजवळ हेटमायरचा झेल घेतला.

Loading...

हा झेल घेतल्यानंतर विराटचा तोल गेला होता. मात्र त्याने हातातील चेंडू निसटून दिला नाही. तसेच त्याच्या शरिराचा स्पर्श बाउंड्री लाइनला लागणार नाही, याचीही त्याने काळजी घेतली. त्यामुळे हेटमायरला 23 धावांवर त्याची विकेट गमवावी लागली.

या झेलबद्दल सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘हा अशा झेलांपैकी होता जो हातात यायला हवा. लाईट समोर येत होते, पण मी फक्त चेंडूकडे लक्ष दिले आणि माझे हात पुढे लांब केले.’

Loading...
Loading...

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 170 धावा केल्या होत्या. भारताकडून शिवम दुबेने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने नाबाद 33 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना केसरिक विल्यम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजकडून सलामीवीर फलंदाज लेंडल सिमन्सने 45 चेंडून नाबाद 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर एव्हिन लूईस(40), हेटमायर(23) आणि निकोलस पुरन(38*) यांनी महत्त्वाचे योगदान दिले.  भारताकडून गोलंदाजीत जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

You might also like
Loading...