---Advertisement---

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

On: शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018 4:11 PM
---Advertisement---

भारतीय संघाने आज आॅस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी प्रयाण केले. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.

या दौऱ्यातील पहिला टी२० सामना २१ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर कसोटी मालिका ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. १२ जानेवारीपासून वन-डे मालिकेला सुरूवात होणार आहे.

भारतीय संघ कधीही आॅस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका जिंकलेला नाही. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्त्व आले आहे.

या मालिकेत स्टिव स्मिथ, डेविड वार्नर सारखे दिग्गज खेळताना दिसणार नाही. चेंडूशी छेडछाड प्रकरणामुळे त्यांच्यावर सध्या १ वर्षाची बंदी आहे.

भारतीय संघ मात्र या दौऱ्यात पुर्ण ताकदनिशी उतरत आहे. भारतीय कसोटी संघातील काही सदस्य़ सध्या न्यूझीलंडमध्ये असून तेथे ४ दिवसांचे सराव सामने भारत अ कडून खेळत आहेत. त्यात अजिंक्य रहाणे, मुरली विजय, पृथ्वी शाॅ, हनुमा विहारीचा समावेश आहे. त्यांची ६ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे.

असा आहे 21 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ-

विराट कोहली, मुरली विजय, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार.

टी२० मालिका- 

२१ नोव्हेंबर- पहिला टी२० सामना- ब्रिस्बेन

२३ नोव्हेंबर- दुसरा टी२० सामना- मेलबर्न

२५ नोव्हेंबर- तिसरा टी२० सामना- सिडनी

कसोटी मालिका-

६ ते १० डिसेंबर- पहिला कसोटी सामना- अॅडलेड

१४ ते १८ डिसेंबर- दुसरा कसोटी सामना- पर्थ

२६ ते ३० डिसेंबर- तिसरा कसोटी सामना- मेलबर्न

०३ ते ०७ जानेवारी, २०१९- चौथा कसोटी सामना- सिडनी

वन-डे मालिका- 

१२ जानेवारी, २०१९- पहिला वन-डे सामना- सिडनी

१५ जानेवारी, २०१९- दुसरा वन-डे सामना- अॅडलेड

१८ जानेवारी, २०१९- तिसरा वन-डे सामना- मेलबर्न

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment