सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. पुणे येथे दौऱ्यातील अखेरची वनडे मालिका खेळवली जात असून, भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, यादरम्यान इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक डेव्हिड लॉईड यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीविषयी वादग्रस्त विधान केले आहे.
विराट मैदानावर करतो हे काम
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानावरील आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा तो मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी भिडताना व पंचांशी वाद घालताना दिसतो. याच विषयाला धरून इंग्लंडचे माजी कसोटीपटू डेव्हिड लॉईड यांनी विराटवर निशाणा साधला आहे.
लॉईड यांनी डेली मेलसाठी लिहिलेल्या स्तंभात म्हटले, “विराट कोहली संधी मिळताच पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. कोहलीला असे वाटले की चौथ्या टी२० सामन्यात डेव्हिड मलानने सूर्यकुमार यादवच्या घेतलेल्या त्या वादग्रस्त झेलावेळी आपण पंचांवर दबाव आणू. सॉफ्ट सिग्नल नियमाविषयी मैदानी पंचांना जास्तीत जास्त अधिकार दिले गेले पाहिजेत. कोहली वारंवार पंचांशी वाद घालून त्यांचा अपमान करतो.”
काय होते प्रकरण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी२० सामन्यात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव अर्धशतक ठोकून खेळत होता. त्यावेळी डेव्हिड मलानने त्याचा झेल पकडला. तो झेल स्पष्टपणे पकडला गेला की नाही हे पाहायचे होते. मात्र, पंचांनी सॉफ्ट सिग्नल ‘आऊट’ दिला होता. रिप्लेमध्ये चेंडू जमीन लागल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाही पंचांनी सॉफ्ट सिग्नल कायम ठेवत त्याला बाद दिले. त्यानंतर विराट कोहलीने उघड नाराजी व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीच्या ‘त्या’ लाल टी-शर्टमागील रहस्य काय? चाहते लावतायेत मजेदार तर्क
पदार्पणातील दमदार कामगिरीने प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव, ‘या’ दिग्गजांनी थोपटली पाठ