आगामी आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यामध्ये ईडन गार्डनच्या मैदानावर होणार आहे. आरसीबीला त्यांच्या पहिल्या ट्रॉफीची अजून तलाश आहे. विराट कोहली या संघासोबत पहिल्या हंगामापासून आहे. त्यामुळे विराट कोहली या संदर्भात संघाला ट्रॉफी जिंकून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तसेच या हंगामात तो शिखर धवनचा मोठा विक्रम मोडू शकतो.
शिखर धवन बद्दल बोलायचे झाल्यास, मागच्या हंगामापर्यंत खेळाडू म्हणून तो आयपीएल स्पर्धेमध्ये सामील होता. पण काही दिवसांपूर्वी त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वात जास्त चौकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये एक आहे, पण त्याचं हे मोठ रेकॉर्ड विराट कोहली या हंगामात तोडू शकतो.
शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या 222 सामन्यांमध्ये 221 डावात 768 चौकार लावले आहेत. तसेच त्याचे आयपीएलमध्ये 6769 धावा आहेत. तसेच विराट कोहली या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
विराट कोहली शिखरचा हा विक्रम मोडून आयपीएलमध्ये सर्वात जास्त चौकार लावणाऱ्या खेळाडूंपैकी एक ठरू शकतो. विराट कोहली आता या यादीमध्ये 705 चौकारांसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. तो शिखरचा हा विक्रम तेव्हाच मोडू शकतो, जेव्हा तो या हंगामात शानदार प्रदर्शन करेल. विराट कोहली आता 64 चौकारांपासून दूर आहे. पण मागच्या काही हंगामातील त्याच प्रदर्शन पाहिलं तर, त्याच्यासाठी ही गोष्ट अवघड नसणार आहे.
विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये एकूण 62 चौकार ठोकले होते. या हंगामात त्याने 741 धावा केल्या होत्या. तसेच 2023 च्या हंगामात कोहलीने 65 चौकार मारले होते. कोणत्याही एका हंगामातील त्याच्या जास्त चौकारांविषयी बोलायचे झाल्यास, त्याने 2016 च्या हंगामात 83 चौकार झळकावले होते.
विराट कोहलीच्या आयपीएल करिअर बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 252 सामन्यात 8004 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल मध्ये सर्वात जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे.