भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांसाठी आजचा दिवस (11 डिसेंबर) खूप खास आहे. तीन वर्षांपूर्वी, 11 डिसेंबर 2017 रोजी हे दोघेही लग्नबंधनात अडकले होते. त्यामुळे आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने विराटने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये होते विराट-अनुष्का
दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. चाहते या जोडप्याला ‘विरुष्का’ या नावाने संबोधू लागले.
विराटने ट्विटरवरून शेअर केला फोटो
विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक गोंडस फोटो शेअर केला आहे. त्यात अनुष्का शर्मा हसून विराटकडे पाहत आहे, तर विराट कोहलीही तिच्याकडे पाहत आहे. हा फोटो शेअर करताना विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, “3 वर्षे आणि आयुष्यभर एकत्र.”
3 years and onto a lifetime together ❤️ pic.twitter.com/a30gdU87vS
— Virat Kohli (@imVkohli) December 11, 2020
इटलीमध्ये केले होते लग्न
विराट-अनुष्काने इटलीच्या ‘टस्कनी’ या शहरात लग्न केले होते. हा लग्नाचा वाढदिवस विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासाठीही पुन्हा एका गोष्टीमुळे खास आहे. कारण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे.
पहिला कसोटी सामना खेळून विराट परतणार भारतात
विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. 17 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पालकत्व रजा घेतल्यामुळे या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळून विराट मायदेशी परतणार आहे.
आयपीएलमध्ये उपस्थित होती अनुष्का
विराट-अनुष्का लॉकडाऊनदरम्यान मुंबईत वास्तव्यास होते आणि इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला समर्थन देण्यासाठी अनुष्का यूएई येथे उपस्थित होती. त्यानंतर विराट युएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला, तर अनुष्का भारतात परतली.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’