भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवत ३-१ अशा फरकाने मालिका खिशात घातली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रूट फलंदाजी करत असताना एक मजेशीर घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रूटला लागला चेंडू
इंग्लंडचा कर्णधार जो रूट इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. त्याने फलंदाजी दरम्यान एक चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवला. तो धाव घेण्यासाठी पळाला नाही तरीही पॉईंटवर क्षेत्ररक्षक असलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला. मात्र, त्याच दरम्यान चेंडू पंतपर्यत न पोहोचता एक टप्पा पडून हलकेच रूटच्या नाजुक भागावर लागला. अचानकपणे चेंडू लागल्याने रूट काहीसा ओरडला. विराटने तात्काळ त्याच्याकडे जाऊन विचारपूस केली.
हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसेच, खिलाडूवृत्ती दाखवल्यामुळे विराटचे कौतुक देखील केले जात आहे.
https://twitter.com/flickofkohli/status/1368108706731159557
https://twitter.com/Spiderverse17/status/1368105978655166464
भारताने जिंकली मालिका
अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळत चार सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना सादर करत ३६५ धावा चोपल्या. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १३५ धावांवर सर्वबाद झाला. सामनावीराचा पुरस्कार रिषभ पंत तर, मालिकावीराचा पुरस्कार रविचंद्र अश्विनला देण्यात आला.
या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जुलै महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: ‘या’ दिवशी होणार १४ व्या हंगामाला सुरुवात, ६ ठिकाणी खेळवली जाणार स्पर्धा?
आशिष नेहराचा ऑटोग्राफ घेत असलेल्या ‘त्या’ युवकाला ओळखलं का? आहे भारताचा मॅच विनर खेळाडू
कसोटी चॅम्पियनशीप: भारताचं फायनलचं तिकीट पक्क! लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध करणार दोन हात