भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली अजून त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतत आहे. विराट काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने खेळत होता, ते पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सचिननंतर दुसरा सर्वात महान फलंदाज विराट असेल, असे बोलले जात होते. पण मागच्या तीन वर्षात त्याची बॅट शांत दिसला. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात मोठ्या काळानंतर शतक ठोकले, पण फॅब फोरमधील त्याचे स्थान यादरम्यानच्या काळात खूपच घसरले आहे.
मागच्या वर्षी आशिया चषकात विराट कोहली (Virat Kohli) याने आपला शतकांचा दुष्का संपवला. 8 सप्टेंबर 2022 रोजी विराटने जवळपास तीन वर्षांच्या काळानंतर टी-20 शतक ठोकले. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात त्याने 122 धावा नाबाद कुटल्या होत्या. त्यानंतर 10 डिसेंबर 2022 रोजी विराटने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वनडे शतक ठोकले आणि वनडे फॉरमॅठमधील शतकाचा मोठा दुष्काळ संपवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 मार्च रोजी सुरू झालेल्या अहमदाबाद कसोटीत विराटने शतक ठोकले आणि कसोटी फॉरमॅटमधील शतकाचा दुष्काळ देखील अखेर संपवला.
मागच्या तीन वर्षांत विराटची बॅट शांत राहिली असली, तरी टी-20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये त्याला अधिक नुकसान सोसावे लागले नाही. पण कसोटी फॉरमॅटमध्ये मात्र फॅब फोर (Fab Four) यादीत त्याचे स्थान घसरले. कसोटी फॉरमॅटमध्ये सध्या सर्वोत्तम असणाऱ्या चार खेळाडूंमध्ये जो रूट, स्टीव स्मिथ, विराट कोहली आणि केन विलियम्सन यांची नावे सामील आहेत. टी-20 आणि वनडेप्रमाणेत विराट काही वर्षांपूर्वी कसोटीत देखील सर्वोत्तम होता. पण मधल्या काळात अपेक्षित खेळी करू शकला नसल्याने त्याचे नाव आता यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचा दिग्गज जो रुट आहे, ज्याने आतापर्यंत 29 कसोटी शतकांसह 10948 धावा साकारल्या आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ आहे, ज्याने 30 कसोटी शतकांसह 8792 धावा केल्या आहेत. विराटचे नाव तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 28 शतकांच्या मदतीने 8416 धावा केल्या आहेत. केन विलियम्सन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने 28 षतकांसह 8124 धावा केल्या आहेत.
सध्या विलियम्सन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या तीन कसोटीत त्याने दोन शतक आणि एक द्विशतक ठोकले आहे. या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर त्याने कसोटी शतकांच्या बाबतीत विराटची बरोबरी देखील केली. शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विलियम्सनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 6वे शतक ठोकले. विलियम्सनचा हा फॉर्म पाहता विराटला फॅब फोरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर घसरण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने आहेत. जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या महत्वाच्या लढतीत विराट भारतासाठी काय कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
(Virat’s position in the Fab Four is declining. Williamson may overtake him soon)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेत पाऊस ठरणार विलन? जाणून घ्या कसे असणार विशाखापट्टणमचे वातावरण
‘आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे…’, भारतीय खेळपट्टीला नावे ठेवणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर