बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने विजय मिळवला. ढाकामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या महत्वपूर्ण खेळीने रोमांचक विजय मिळवला. भारताने या विजयाने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. अश्विनच्या शानदार खेळीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्यामध्ये भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश आहे. त्याने अश्विनबाबत केलेली पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने झटपट पहिल्या चार विकेट्स गमावल्या. चौथ्या दिवशीही रिषभ पंत (Rishabh Pant) लवकरच तंबूत परतला. यामुळे संघाचा पराभव जवळ दिसत होता. त्याचक्षणी आर अश्विन (R Ashwin) याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 42 धावा केल्या. त्याच्या या अद्वितीय खेळीचे कौतुक सेहवागने नेहमीप्रमाणे त्याच्या अनोख्या अंदाजात केले आहे. सेहवागने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अश्विनचा केमिकल लॅबमधील फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ साइंटिस्टने (वैज्ञानिक) करून दाखविले. हा फोटो कुठून तरी मिळाला. अश्विनने उत्तम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरसोबत अप्रतिम भागीदारी केली.’
The scientist did it. Somehow got this one. Brilliant innings from Ashwin and wonderful partnership with Shreyas Iyer. pic.twitter.com/TGBn29M7Cg
— Virender Sehwag (@virendersehwag) December 25, 2022
सेहवागबरोबर दिनेश कार्तिकही अश्विन-अय्यरच्या फलंदाजीचा चाहता झाला. त्याने ट्वीट करत लिहिले, ‘दबावाखाली अय्यर-अश्विनने चांगली फलंदाजी केली. कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी केवळ एक पाऊल दूर.’
Outstanding batting under pressure by @ashwinravi99 and @ShreyasIyer15.
Pure class. Well done Team India! 🇮🇳
Need to have more of such hard fought games to keep this format ticking.One step closer to the World Test Championship finals!#BANvIND pic.twitter.com/mJhoKVQNRQ
— DK (@DineshKarthik) December 25, 2022
या सामन्यात भारत 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाने पहिल्या चार विकेट्स 37 धावसंख्येवरच गमावल्या होत्या. पंतही 9 धावा करत मेहदी हसन मिराजचा बळी ठरला. पुढे अय्यर-अश्विन जोडीने आठव्या विकेटसाठी 105 चेंडूत नाबाद 71 धावांची भागीदारी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. अश्विनने या सामन्यात एकूण 6 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यामुळे तो सामनावीराचा मानकरी ठरला.
भारत या कसोटी मालिकेत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळला. यातील पहिला सामना 188 धावांनी जिंकल्याने भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता या मालिका विजयाने भारताच्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा आणखी बळकट झाल्या आहेत. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत 58.93 टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. Virender Sehwag & Dinesh Karthik Tweet About R Ashwin Batting BANvIND 2nd Test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- बांगलादेश सामन्याची दिशा बदलणाऱ्या 5 मोठ्या घटना, एक नजर टाकाच
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी