रविवारी (२५ ऑक्टोबर) जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील ४४वा सामना झाला. दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ८ विकेट्सने मात दिली. दरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक एबी डिविलियर्सच्या हळूवार फलंदाजीला पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने त्यांची चांगलीच थट्टा केली.
सेहवाग त्याचा शो ‘वीरुची बैठक’मध्ये बोलताना म्हणाला की, “चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली होती. त्यानंतर संघाने चांगली सुरुवातदेखील केली. पण पुढे जे झालं ते नक्की काय होतं? ७व्या षटकात विराट आणि डिविलियर्सने सोबत फलंदाजी करायला सुरुवात केली आणि १८व्या षटकापर्यंत त्यांची फलंदाजी कोमामध्ये गेली होती. तेवढ्या वेळेत मी एक झोप घेतली आणि उठल्यानंतर पाहतो तर काय, ते दोघे अजूनही फलंदाजी करत होते.”
सेहवागने त्याचा हा व्हिडिओ इंस्ट्राग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओला त्याने ‘चिकू सेना बनली मामू,’ असे अतिशय मजेदार कॅप्शन दिले आहे.
चेन्नई-बेंगलोर सामन्यात विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४३ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. तर डिविलियर्सने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३६ चेंडूत ३९ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्क्यावर धक्के! आंद्रे रसेलसह पाच परदेशी खेळाडूंची ‘या’ मोठ्या टी२० लीगमधून माघार
काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार
कर्नाटकचा गोलंदाज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सला नाचवणार फिरकीच्या तालावर, म्हणाला ‘हे तर स्वप्न…’
ट्रेंडिंग लेख-
अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…
वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!
चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे