आपल्याला जर यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर आपल्यासोबत कोणतरी मार्ग दाखवणारा व्यक्ती हवा. कधी कधी आपल्याला ती गोष्ट सांगणारे सुद्धा मिळतात. परंतु, त्या गोष्टीचे सांत्वन कसे करायचे हे कोणी सांगत नाही. अशीच गोष्ट घडलीय ती म्हणजे भारतीय संघाचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागसोबत. कारकीर्दीच्या माध्यानकाळी सेहवाग खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळेस त्याला फलंदाजीत चुका दाखवणारे खूप भेटले. परंतु, ती चूक सुधरवणारे खूप कमी होते. त्याचा कठीणप्रसंगी त्याला कोणी-कोणी मदत केली? या गोष्टीचा खुलासा खुद्द सेहवागने केला आहे.
वीरेंद्र सेहवागला गोलंदाजी करायला खूप गोलंदाज घाबरत असे. सेहवाग पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडत असे. पण प्रत्येक खेळाडूच्या जीवनात खराब फॉर्मचा काळ येतो, ज्यामुळे तो काय करावे आणि काय नाही? या संभ्रमात पडून जातो. असेक एकदा सेहवागच्या बाबतीत घडले. सेहवाग सांगतो कि, “तुम्हाला तुमच्या चुका दाखवणारे खूप मिळतील. परंतु, ती चूक कशी सुधरवता येईल हे कोणी सांगत नाही. पण माझ्या मदतीला तीन खेळाडू धावून आले होते.”
सेहवाग सांगतो कि, “सगळे मला सांगायचे, तुला तुझा फूट मूवमेंट बदलण्याची खूप गरज आहे. परंतु, कसे बदलायचे हे कोणी सांगितला नाही. तेव्हा मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावस्कर आणि कृष्णामचारी श्रीकांत यांचा मार्गदर्शनाने मला लेग स्टंपच्या जागी मिडल ऑफ गार्ड घेण्यास सांगितले आणि मला त्याचा खूप फायदा झाला.”
क्रिकेट हा खेळ मैदानावर खेळला जातो. परंतु, त्याच्यासाठी खूप सरावाची गरज असते. “मी माझे उदाहरण देऊन सांगतो कि, मी १९९२ सालच्या विश्वचषक स्पर्धेपासून क्रिकेट पाहण्यास सुरवात केली. त्या वेळेस मी सचिनला फलंदाजी करताना बघत असे त्याचासारखा खेळण्याचा सराव करायचो. तो कशाप्रकारे शॉट खेळतो कुठल्या चेंडूला कुठला शॉट मारतो. जर टीव्हीवर शिकता आले असते तर तेवढंच शिकलो असतो,” असे सेहवागने म्हटले.
सेहवाग शेवटी सांगतो कि, “आतासारख्या सोई सुविधा असत्या तर मी भारतीय संघासाठी अजून खेळलो असतो. आजच्या घडीला ते सर्वांचे छायाचित्रण आहे, ज्यांना आपण पसंद करतो. एबी डिविलियर्स, ब्रायन लारा किंवा मी स्वत: आणि अजून कोणीही असता तर तो, त्या छायाचित्रणाच्या मदतीने त्याचा चुकांची दुरुस्ती करू शकला असता आणि अजून काही काळ आपल्या संघासाठी खेळला असता.”
सेहवागने भारतीय संघा साठी १०४ कसोटी सामने खेळले. त्यात त्याने ८५८६ धावा केल्या होत्या. तसेच २५१ एकदिवसीय सामन्यात ८२७३ धावा आणि १९ टी-२० सामन्यात ३९४ धावांची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे दिल्लीकर सिमरजीत सिंग, ज्याला भारतीय संघासोबत श्रीलंकेला जाण्याची मिळाली संधी?
WTC फायनलसाठी भज्जीची ३०३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला नापसंती; म्हणे, ‘त्याला बसवा बाहेर’