भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त प्रदर्शन केले. उभय संघातील एकदिवसीय मालिकेत भारताने यजमान इंग्लंडला क्लीन स्वीप (0-3) दिला. मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (24 सप्टेंबर) भारताने जिंकला आणि अष्टपैलू दिप्ती शर्मा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. दीप्तीने भारतासाठी शेवटची विकेट, ज्या पद्धतीने घेतली, त्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, पण भारताचा माजी दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवागने त्या सर्वांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय संघाने विजयासाठी इंग्लंडपुढे 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंड संघासाठी हा विजय सोपा असेल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. मैदानात पूर्णपणे गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. असे असले तरी, इंग्लंडच्या शेवटच्या विकेटसाठी फ्रेया डेविस आणि चार्ली डीन यांनी चांगली भागीदारी केली होती. विजयासाठी अजून 16 धावा हव्या होत्या आणि पुरेशी षटके (6) देखील शिल्लक होती. परंतु दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने डावातील 44 व्या षटकात नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला धाबवाद करून सामना नावावर केला. दिप्तीने चेंडू टाकण्याआधीच नॉन स्ट्राईकवरील चार्ली डीनने क्रीज सोडली होती. परिणामी तिला विकेट गमवावी लागली.
स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम बिलिंग्स यांच्यासारख्या अनेक मोठ्या खेळाडूंनी दिप्तीवर निशाणा साधला आहे. या खेळाडूंना भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने स्पष्ट उत्तर दिले. सेहवागने अधिकृत ट्वीटर खात्यावर पोस्ट केली की, “ज्यांनी हा खेळ बनवला, तेच या खेळाचे नियम विसरले आहेत.” त्याने या ट्वीटमध्ये क्रिकेटचा नियम 41.16.1 चा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, “जर नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाने कोणत्याही वेळी गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी क्रीज सोडली आणि गोलंदाजाने त्याला धावबाद केले, तर त्याला बाद करार दिला जाईल.”
Funny to see so many English guys being poor losers. #Runout . pic.twitter.com/OJOibK6iBZ
— Virender Sehwag (@virendersehwag) September 24, 2022
दरम्यान, या नियमाला काही महिन्यांपूर्वीच एमसीसीने मान्यता दिली होती. यापूर्वी भारतीय संघाचा रविचंद्रन अश्विनवर देखील याच कारणास्तव अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लाईव्ह येताच धोनीची भविष्यवाणी! सांगितले, कोण होणार टी20 वर्ल्डकप 2022चा विजेता?
मोठ्या बातमीच्या आशेने चाहत्यांनी टवकारले कान! एमएस धोनीने केले ‘हे’ जाहीर