भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका सहा महिन्याची झाली आहे. विरुष्काने आपल्या मुलीचा सहा महिन्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यादरम्यानचे फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विरुष्काने इंग्लंडमधील एका पार्कमध्ये वामिकाचा वाढदिवस साजरा केला आहे.
विरुष्का मुलीसोबत पार्कमध्ये दिसून आले
अनुष्का शर्माने 11जुलैला आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अनुष्का चटईवर झोपली असून वामिकाला तिने पोटावर झोपवले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये विराट कोहलीने आपल्या मिठीत वामिकाला घेतले आहे. तिसऱ्या फोटोमध्ये विरुष्काचा एक-एक पाय आणि वामिकाच्या दोन्ही पायांचा फोटो पोस्ट केला आहे. त्याचबरोबर पुढील फोटोत केकचा फोटो दिसून येत आहे. अशाप्रकारे अनुष्काने एकूण चार फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
अनुष्काने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, ‘तिच्या एका हसण्याने आमचे संपूर्ण जग बदलून जाते. वामिकाला 6 महिन्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ अनुष्काने शेअर केल्या या पोस्टला एका तासामध्ये 13 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचे सर्व सेलिब्रेटी या फोटोवर कमेंट करत आहेत.
11 जानेवारी 2021 रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुलगी वामिकाचे स्वागत केले होते. विराट कोहलीला मुलगी झाल्यानंतर त्याने ट्वीट करून सांगितले होते की, ‘आम्ही दोघेही खूप खूष आहोत. आज दुपारी अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल मनापासून आभार मानतो. अनुष्का आणि आमची मुलगी दोघेही पूर्णपणे ठीक आहेत आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला हा क्षण अनुभवायला मिळाला. आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्ही आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्याल.’
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी ‘वामिका’ या नावावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, विराटच्या नावाचे प्रारंभिक अक्षर ‘व्ही’ आणि अनुष्काच्या नावाचे शेवटचे अक्षर ‘के’ जोडून हे नाव ठेवले गेले आहे. वामिका हे देवी दुर्गाचे एक नाव आहे आणि देवी दुर्गाचे एक प्रतीक आहे. हे भगवान शिव आणि पार्वती नावाच्या नावाचे संयोजन आहे असेही मानले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉने संघातील वरिष्ठ गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, सलामीसाठी दर्शवली दावेदारी
दिप्तीने चेंडूला हातही न लावता इंग्लंडच्या कर्णधाराला केले धावबाद; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘गजब!’
क्या बात! क्रिकेट खेळून देशसेवा केल्यानंतर, आता ‘हा’ क्रिकेटपटू बनलाय आर्मीमध्ये मेजर