पुणे, 8 ऑक्टोबर 2023: आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विशाल विष्णू, प्रसनजीत पॉल, पार्थ चिवटे, अजिंक्य पाटणकर यांनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून आजचा दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 30 वर्षांवरील गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत विशाल विष्णू याने अव्वल मानांकित अनय पाटीलचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. पार्थ चिवटेने चौथ्या मानांकित गौरबदीप घोषचा 6-3, 6-0 असा तर, अजिंक्य पाटणकरने सहाव्या मानांकित गौरव पटेलचा 6-4, 6-2 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. प्रसनजीत पॉल याने तिसऱ्या मानांकित किरण कोट्टीचे आव्हान 6-4, 6-2 असे संपूष्टात आणले.
35 वर्षांवरील गटात दुसऱ्या फेरीत रवींद्रनाथ पांडे, मिलिंद मारणे, नितीन सावंत, नितीन राजपुरे, गणेश देवखिळे, नरहर गर्गे, केतन धुमाळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकुच केली. (Vishal, Prasanjit, Parth, Ajinkya beat seeds in MT ITF S400 Senior Tennis Championship)
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
30 वर्षांवरील गट: उपउपांत्यपूर्व फेरी:
विशाल विष्णू(भारत)वि.वि.अनय पाटील(भारत)(1) 6-2, 6-3;
अमृत सुंदरकुमार(भारत)वि.वि.समीर सोनवणे(भारत)6-3, 6-0;
पार्थ चिवटे(भारत)वि.वि.गौरबदीप घोष(भारत)(4) 6-3, 6-0;
अजिंक्य पाटणकर(भारत)वि.वि.गौरव पटेल(भारत)(6) 6-4, 6-2;
प्रसनजीत पॉल(भारत)वि.वि.किरण कोट्टी(भारत)(3) 6-4, 6-2;
राघवेंद्र सुब्रमण्य(भारत)(8)वि.वि.सौरव प्रसाद(भारत)6-1, 6-3;
अरुण भोसले(भारत)(2)वि.वि.शिलादित्य बॅनर्जी(भारत)6-0, 7-6(7);
35 वर्षांवरील गट: दुसरी फेरी:
रवींद्रनाथ पांडे(भारत)वि.वि.भूषण जोशी(भारत)6-0, 6-1;
मिलिंद मारणे(भारत)(6)वि.वि.यशराज उभे(भारत) 6-1, 6-2;
नितीन सावंत(भारत)(4)वि.वि.हर्षल सोपारीवाला(भारत)6-4. 6-4;
नितीन राजपुरे(भारत)वि.वि.अक्षय नवलादी(भारत)(7) 6-1, 6-0;
गणेश देवखिळे(भारत)(5)वि.वि.सारंग पत्की(भारत)6-0, 6-0;
नरहर गर्गे(भारत)(8)वि.वि.अमित मेटे(भारत)6-0, 6-0;
केतन धुमाळ(भारत)(2)वि.वि.अमित दीक्षित(भारत)6-2, 6-1;
40 वर्षांवरील गट: दुसरी फेरी:
हरीश रामचंदानी(भारत)वि.वि.कौस्तुभ देशमुख(भारत)6-3, 1-6, 10-5;
अमित टिळक(भारत)(6)वि.वि.अश्विन कामत(भारत) 6-0, 6-0;
गिरीश मिश्रा(भारत)(5)वि.वि.दर्शन गुप्ता(भारत)6-1, 6-0;
श्रीराम ओका(भारत)वि.वि.रतीश रतुसरिया(भारत)6-1, 1-6, 10-6;
अभिजीत मुझुमदार(भारत)(9)वि.वि.समीर मन्सुरी(भारत)6-0, 6-0;
अमित किंडो(भारत)(5)वि.वि.जितेंद्र सावंत(भारत)6-3, 6-0;
50 वर्षांवरील गट: उप-उपांत्यपूर्व फेरी
सुनील लुल्ला(भारत)(1)वि.वि.रिकी मेहरा(भारत) 6-1, 6-2;
नवीन अग्रवाल(भारत)(6)वि.वि.सहदीप नूलकर(भारत)6-2, 6-1;
बालन रामदास(भारत)(3)वि.वि.किरण बेमरकर(भारत)6-1, 1-6, 12-10;
आशीष मालपाणी(भारत)(8)वि.वि.ए नायर(भारत) 4-6, 6-3, 10-6;
राजेश गणपती(भारत)(5)वि.वि.पंकज यादव(भारत)6-1, 6-1;
आशिष पंत(भारत)(4)वि.वि.मकतुमसाहेब काझी(भारत)6-1, 6-1;
आरव्हीआरके रंगा राव(भारत)(2)वि.वि.शिवाजी यादव(भारत)6-1, 6-4;