रविवारी (१८ एप्रिल) क्रिडाजगतातून एक दु:खद बातमी पुढे येत आहे. रस्ता अपघातात भारताचा युवा टेबल टेनिसपटू विश्व दीनदयालन याचा मृत्यू झाला आहे. शोकवार्ता अशी की, त्याचे वयाच्या केवळ १८व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच माजी क्रिडा मंत्री किरेन रिजिजू, विद्यमान क्रिडामंत्री अनुराग ठाकूर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान इत्यादी मोठ्या व्यक्तींनीही त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, तमिळनाडूचे ४ टेबल टेनिसपटू ८३व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चँपियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी मेघालयातील गुवाहाटीवरून शिलाँगला निघाले होते. टॅक्सीने जात असताना मोठ्या ट्रकने त्यांना धडक (Vishwa Deendayalan Died In Road Accident) मारली, ज्यामध्ये या खेळाडूचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या वाहनाला रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येत असलेल्या वाहनाने धडक दिली आणि ते वाहन खड्ड्यात जाऊन पडले. या अपघातात टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून जखमी दीनदयालनला (Vishwa Deendayalan) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
The demise of TT champion Vishwa Deenadayalan is shocking and saddening. He was admired by fellow players and had distinguished himself in several competitions. In this tragic hour my thoughts are with his family and friends. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2022
या दुर्दैवी अपघातानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. ‘टेबल टेनिस चॅम्पियन विश्व दीनदयालनचे निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. तो त्याच्या कामगिरीने सहकारी खेळाडूंच्या कौतुकास पात्र ठरला आणि अनेक स्पर्धांमध्ये त्याने इतरांपासून स्वत:ला वेगळे केले. या दु:खद प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आहेत. ओम शांती, असे मोदींनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.’
Extremely distressed to know about the tragic and untimely demise of a rising national table tennis player Vishwa Deenadayalan from Tamil Nadu, in an accident in Meghalaya. My thoughts are with the bereaved family, friends, and admirers.
May his soul attain Sadgati.
।।ॐ शांति।। pic.twitter.com/AcKZCzwlQa
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 18, 2022
Very sad to learn that young Table Tennis player from Tamil Nadu, Deenadayalan Vishwa died in an accident at Ri-Bhoi in Meghalaya while on his way to Shillong to participate in the 83rd Senior National Table Tennis Championship. My deepest condolences to his family. RIP pic.twitter.com/eaUweRzdiC
— Kiren Rijiju (@KirenRijiju) April 17, 2022
Shocked beyond words to hear about the heartbreaking & untimely demise of our young, promising Table Tennis player Vishwa Deenadayalan. He was a legend-in-making and it pains me that he left us too soon.
I offer my deepest condolences to his family, friends & sports fraternity. pic.twitter.com/hFlrR0Mycl
— M.K.Stalin (@mkstalin) April 18, 2022
Heartbreaking to learn that Tamil Nadu paddler, Deenadayalan Vishwa passed away in an accident in Ri Bhoi District. He was on his way to Shillong to participate in the 83rd Senior National Table Tennis Championship. Sincere condolences to his family & friends. pic.twitter.com/XpeJMG4ad3
— Anurag Thakur (@ianuragthakur) April 18, 2022
तसेच इतर मंत्र्यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दोघांच्या समान विकेट्स, पण तरीही टी नटराजन ऐवजी युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप कशी? वाचा काय आहे नियम