पुणे। नगरसेवक किरण दगडे पाटील व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व चौथ्या केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2020 स्पर्धेत 12वर्षाखालील मुलांच्या गटात विश्वराज इंगवले, आदी पारस्कर, आभीर भारपांडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
किरण दगडे टेनिस अकादमी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत विश्वराज इंगवले याने तनिष शेठचा टायब्रेकमध्ये 6-5(7) असा पराभव करून विजयी सलामी दिली.
शौनक रणपिसे याने अनुराग एसला 6-3 असे नमविले.वरद उंदरे याने मिहीर केळकरचा 6-1 असा तर, तनिष्क देवरेने आरुष देशपांडेचा 6-2 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली.
चुरशीच्या लढतीत आदी पारस्करने वेद देशमुखचा 6-5(7) असा, तर आभीर भारपांडे याने आदि भालेरावचा टायब्रेकमध्ये 6-5(3) असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
12वर्षाखालील मुले:
पहिली फेरी:
वेद कोटणीस वि.वि.वेदांत मलिक 6-4;
विश्वराज इंगवले वि.वि.तनिष शेठ 6-5(7);
सनथ कडले वि.वि.ईशान ओक 6-0;
शौनक रणपिसे वि.वि.अनुराग एस.6-3;
प्रांशु नारपनवर वि.वि.क्षितिज देशपांडे 6-0;
वरद उंदरे वि.वि.मिहीर केळकर 6-1;
तनिष्क देवरे वि.वि.आरुष देशपांडे 6-2;
आदी पारस्कर वि.वि.वेद देशमुख 6-5(7);
आभीर भारपांडे वि.वि.आदि भालेराव 6-5(3);
यश अत्रे वि.वि.आर्य खंदाडे 6-0.