विश्वशांती क्रीडा मंडळ व शिवशक्ती महिला संघाचा शिवनेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेत बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस व सेंट्रल बँक संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. महिला गटात शिवशक्ती महिला संघ व विश्वशांती क्रीडा मंडळ या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महिला गटात काल (२ऑक्टोबर) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत शिवशक्ती महिला संघाने सिद्धी स्पोर्ट्स क्लब संघाचा ४८-०९ असा एकतर्फी पराभव केला. मध्यंतरापर्यत ३४-०५ अशी भक्कम आघाडी शिवशक्ती संघाने घेतली होती. शिवशक्ती संघाकडून रेखा सावंत, अपेक्षा टाकले, पुजा यादव, प्रतीक्षा तांडेल यांनी उत्कृष्ट खेळ केला.

महिला गटातील दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विश्वशांती क्रीडा मंडळ संघाने ३५-१४ अशी ओम क्रीडा मंडळावर मात दिली. विश्वशांती क्रीडा मंडळाकडून लता भगत, शीतल मेंगडे व विशाखा बागडे यांनी चांगला खेळ केला. महिला गटात शिवशक्ती व विश्वशांती यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आज उर्वरित दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील.

विशेष व्यावसायिक ‘ब’ गटात बँक ऑफ इंडियाने जिजाऊ कॅट्रक्शन संघावर तर ३३-१७ तर महिंद्रा अँड महिंद्रा संघावर ३५-२८ असे सलग दोन विजय मिळवत बादफेरीत प्रवेश निश्चित केला. महिंद्राने गटात उपविजयी होत बादफेरीत प्रवेश मिळवला.

‘अ’ गटात सेंट्रल बँक विरुद्ध मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण सामन्यांत सेंट्रल बँकेने ४०-२० अशी बाजी मारत बादफेरीत प्रवेश निश्चिंत केला. ‘क’ गटात महाराष्ट्र पोलीस विरुद्ध जे जे हॉस्पिटलमध्ये लढत झाली. महाराष्ट्र पोलीस संघाने ३३-०६ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला. आज युनियन बँक विरुद्ध जे जे हॉस्पिटलमध्ये गटातील महत्वपूर्ण लढत होईल.

महाविद्यालयीन गटात वंदे मातरम विरुद्ध के एम पटेल कॉलेज यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरापर्यत १६-०६ अशी आघाडी के एम पटेलकडे असताना देखील वंदे मातरम संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत २५-२४ अशी बाजी मारली. ज्ञान विकास महाविद्यालयाने इंदिरा गांधी कॉलेजवर २४-२० असा विजय मिळवला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एयर इंडिया, भारत पेट्रोलियम संघाचा शिवनेरी कबड्डी स्पर्धेच्या बादफेरीत प्रवेश

दबंग दिल्लीच्या नवीन एक्सप्रेसला मेगाब्लॉक नाही…

You might also like

Leave A Reply