भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला नंतर भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. यादरम्यान विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करत त्याने मुंबई संघाला चौथे जेतेपद मिळवून दिले होते. यासोबतच त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामात त्याने तब्बल ८२७ धावा केल्या होत्या. तरीदेखील त्याला इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या वनडे संघात संधी मिळाली नाही, अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूने पृथ्वी शॉने लवकरच संघात पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पूर्ण अपयशी ठरलेल्या शॉने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.परंतु इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत त्याच्या कामगिरीची दखल घेतली गेली नाही.
भारतीय संघात रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांसारखे अनुभवी सलामी फलंदाज असताना शॉला संघात स्थान मिळवणे कठीण गेले. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी म्हटले की, “मी सर्वात जास्त या गोष्टीने प्रभावित झालो आहे की, त्याने आपल्या फलंदाजीमध्ये तांत्रिक बदल घडवून आणले. त्याचे प्रदर्शनच नव्हे तर, त्याच्या फलंदाजीमध्ये तांत्रिक चुका होत्या. ज्यावर त्याने मेहनत घेऊन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तो एक सामना जिंकवणारा खेळाडू आहे. मला विश्वास आहे की त्याला संधी मिळेल.
तसेच तो पुढे म्हणाला, “ज्याप्रकारे पृथ्वी शॉने प्रदर्शन केले आहे, ज्याप्रकारे त्याने मुंबई संघाचे नेतृत्व करत मुंबई संघाला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. यावरून त्याला वनडे संघाचा भाग असायला हवे होते. परंतु निवड समितीने अशाच खेळाडूंना संधी दिली आहे, ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आशा खेळाडूंची रांग बनली आहे, ज्या रांगेत पृथ्वी शॉ मागे आहे. कारण भारतीय संघात या वेळेस शुबमन गिल देखील आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या संधीचे सोने करत चांगली कामगिरी केली आहे.”
पृथ्वी शॉची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी
पृथ्वी शॉने या स्पर्धेत अनेक विक्रम केले. त्याने मुंबई संघाचे नेतृत्व करत असताना मुंबई संघाला चौथे जेतेपद मिळवून दिले. यासोबतच त्याने या स्पर्धेत ८२७ धावा केल्या होत्या. यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. तर एक दुहेरी शतकाचा देखील समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पॉंटिंगच्या नजरेत भरला म्हणून भारतासाठी खेळला; वाचा अशोक डिंडाच्या आयपीएल एन्ट्रीची शानदार कहाणी