सध्या भारतीय पुरुष क्रिकेटपटूंचे दोन संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या देशांमध्ये खेळताना दिसत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील प्रमुख संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर, शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरा संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळतोय. ऑस्ट्रेलियात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे संघाला मार्गदर्शन करत आहेत. तर, भारतात ही जबाबदारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, द्रविड यांच्या अनुपस्थितीत मागील काही काळापासून लक्ष्मण यांनी केलेली कामगिरी द्रविड यांनाच आव्हान बनू शकते.
मागील वर्षी रवी शास्त्री यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक पद सोडल्यानंतर द्रविड यांची त्या जागेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनात संघाने ठीकठाक कामगिरी केली आहे. मात्र, संघाला आशिया चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात अपयश आले. आता विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आव्हान राहुल द्रविड व संघापुढे असेल.
द्रविड ज्या-ज्या वेळी भारतीय संघासोबत नव्हते त्यावेळी लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेलीये. विशेष म्हणजे त्यांनी संघाला यांच्या मार्गदर्शनात एकदाही मालिका गमवावी लागली नाही. लक्ष्मण संघाचे अंतरिम प्रशिक्षक असताना आयर्लंड, इंग्लंड व झिम्बाब्वेमध्ये मालिका जिंकल्या आहेत. तर सध्या सुरू असलेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. ही मालिका जिंकून लक्ष्मण आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक पान जोडू इच्छितात.
भारतात पुढील वर्षी वनडे विश्वचषक होणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी चे संचालक म्हणून लक्ष्मण यांच्यावर योग्य खेळाडू तयार करण्याची जबाबदारी असेल. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या अनेक युवा खेळाडू तयार होत आहेत. त्यामुळे राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण ही जोडी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर संघाला पुन्हा एकदा विश्वविजेते बनवण्यासाठी प्रयत्न करतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड
‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय