आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, स्पर्धेतील 13 पैकी 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. अशात भारत पाकिस्तान आणि गतविजेता श्रीलंका संघ यावर्षी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. असे असले तरी, स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा वेळ बाकी असताना श्रीलंकन संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. त्यांचा अष्टपैलू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे आशिया चषकातून माघार घेणार, अशा बातम्या समोर येत आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) मागच्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता. त्याचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. याच कारणास्तव आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मधूनही तो बाहेर पडण्याची पूर्ण शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिली गेली नाहीये. पण हसरंगा माघार घेणार अशा बातम्यांनीच श्रीलंकन संघाच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. सोबतच संघातील इतर खेळाडूंचीही डोकेदुखी यामुळे वाढली आहे. आशियाई खेळपट्टीवर हसरंगा संघासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन करू शकतो. अशात आशिया चषकात त्याच्या अनुपस्थितीत श्रीलंकन संघाला याची किंमत मोजावी लागू शकते.
त्यातच हसरंगा अलिकडच्या काळात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. लंका प्रीमियर लीगमध्ये यावर्षी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने मालिकावीर पुरस्दार देखील जिंकला होता. लीगमध्ये 10 सामन्यांमधील 9 डावांमध्ये हसरंगाने 34.88च्या सरासरीने आणि 189.90च्या स्ट्राईक रेटने 279 धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. गोलंदाजी विभागात त्याने 10 सामन्यात 10.74च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या होत्या. (Wanindu Hasarahga unlikely to be available for aisa cup 2023 due to injury)
महत्वाच्या बातम्या –
आशिया कपवर कोरोनाचे सावट! स्पर्धा सुरू होण्याआधीच घडलं असं, लगेच वाचा
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत क्वालिफायर १मध्ये रेव्हन्स, हॉक्स संघांचा प्रवेश