मुंबई । क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि अभिनेते यांचे सोशल मीडियावरील अकाऊंट सतत हॅक होताहेत. शुक्रवारी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक वकार युनूस यांचे ट्विटर अकाऊंट हॅकरने हॅक केले. त्यानंतर या हॅकरने त्यांच्या अकाऊंटवर काही अश्लील व्हिडिओ पोस्ट केले.
ट्विटर हॅक केल्यानंतर यापुढे सोशल मीडिया वापरणार नसल्याचे त्यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले.
वकार म्हणाले की, या घटनेमुळे मी दुखी झालो आहे. जेव्हा सकाळी उठून मी ट्विटर अकाउंट पाहिलो तर त्या वेळेस मला माझे अकाऊंट हॅक झाल्याचे समजले. त्यावर काही अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही शरमेची बाब आहे. लोकांशी संपर्कात राहण्यासाठी ट्विटर हे चांगले साधन होते. मात्र, दुर्दैवाने हॅकरने सारं काही वाटोळे केले.
https://twitter.com/waqyounis99/status/1266180048492482560?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1266180048492482560&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fcricket%2Fwaqar-younis-quits-social-media-after-anonymous-hacker-liked-obscene-video-from-his-twitter-account-2237207
वकार युनूस पुढे बोलताना म्हणाले की, अशी घटना माझ्याबाबतीत यापूर्वीही झाली आहे. हा हॅकर असे पुढेही करू शकतो. त्यामुळे मी सोशल मीडिया न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. आजपासून तुम्ही मला सोशल मीडियावर पाहू शकणार नाही. या गोष्टीमुळे कोणाला वाईट वाटले तर मला माफ करा.
मागील वर्षी भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याच्याबरोबरही असेच घडले होते. कुलदीप यादवचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले होते. हॅकरने कुलदीपच्या अकाऊंटवर काही फोटो पोस्ट करण्यात आले होते जेव्हा कुलदीपला याची माहिती झाली तेव्हा त्याने क्रिकेट फॅन्सची माफी मागितली. हॅकरने अकाऊंट हॅक केल्यामुळे असे घडल्याची माहिती त्याने दिली.
क्रिकेट खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सबरोबर संपर्क राहण्याचा प्रयत्न करतात. विचारांचे आदान प्रदान व आपल्या विषयीचे लेटेस्ट अपडेट ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. काही क्रिकेटपटू सामाजिक काम करताना सोशल मीडियाचा आधार घ्यायचे. वकार युनिस यांनी ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.