रविवारी (११ एप्रिल) आयपीएल २०२१ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात आयपीएलमधील दोन्ही विदेशी कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकतील. हैदराबादचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नर तर केकेआरचे नेतृत्व ओएन मॉर्गन करेल. आकडेवारीनुसार, केकेआर हैदराबादपेक्षा वरचढ आहे. मात्र, दोन्ही संघ मजबूत भासत असून, अशा परिस्थितीत ही लढत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
हे आहेत वॉर्नरचे नंबर एक समर्थक
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर व सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या सामन्यापूर्वी आपल्या तिन्ही मुलींची दोन छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केली आहेत. पहिल्या छायाचित्रात ईव्ही, इंडी आणि इस्ला या वॉर्नरच्या तीन मुली सनरायझर्स हैदराबादची जर्सी परिधान केलेल्या दिसत आहेत. तर दुसर्या छायाचित्रात सर्वात धाकटी मुलगी दोन्ही हातात ग्लोव्ह्ज घातलेली दिसत आहे. वॉर्नरने फोटोचे कॅप्शन लिहिले आहे की, ‘आज रात्री आपण आमच्या पहिल्या सामन्यासाठी तयार असाल तर हात वर करा. माझे पहिल्या नंबरचे समर्थक तयार आहेत.’
संतुलित भासत आहे हैदराबादचा संघ
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद यावर्षी देखील मजबूत भासत आहे. वॉर्नर व बेअरस्टोच्या रूपाने संघाकडे आंतरराष्ट्रीय दर्जाची सलामी जोडी आहे. मधल्या फळीत केन विलियम्सन, मनिष पांडे व युवा प्रियम गर्ग संघासाठी धावा जमवतील. अष्टपैलू म्हणून संघाकडे युवा अब्दुल समद, केदार जाधव, विजय शंकर व मोहम्मद नबी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
हैदराबादची खरी ताकद त्यांची गोलंदाजीची आहे. भुवनेश्वर कुमार व टी नटराजन हे भारतीय संघातील गोलंदाज वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करतील. त्यांच्या साथीला खलील अहमद, संदीप शर्मा व सिद्धार्थ कौल असतील. राशिद खानसारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा फिरकीपटू त्यांच्याकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
देवदत्त पड्डीकलमुळे आयपीएलमधील सर्व संघांचा चढला पारा, पाहा काय आहे नक्की कारण
Video: चेन्नईला पराभूत केल्यानंतरही पंतने जिंकली धोनीच्या चाहत्यांची मने, ‘हे’ आहे कारण