विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याकरीता भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. तत्पूर्वी, वॉशिंग्टन सुंदरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलगिकरणात होते. १४ दिवसांच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. परंतु विलगिकरणाचा काळ सुरू असताना काही खेळाडू रूमच्या बाहेर देखील आले नव्हते. आर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर खुलासा करत सांगितले होते की,” वॉशिंग्टन सुंदर १९ मे पासून आपल्या रूमच्या बाहेर आलाच नाही. इतर खेळाडूंनी फिटनेस सेशन सुरू केले होते.”
तसेच विलगिकरणाचा कालावधी संपल्यानंतर हे खेळाडू एकमेकांना भेटले होते. अशातच वॉशिंग्टन सुंदरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आर अश्विन सोबतचा सेल्फी शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून “अखेर आम्ही भेटलो” असे लिहिले आहे. हा फोटो पाहून जाणवेल की दोघांना एकमेकांना भेटून किती आनंद झाला आहे.
Finally, we meet! 😅 @ashwinravi99 pic.twitter.com/1fr6GlGwyG
— Washington Sundar (@Sundarwashi5) June 2, 2021
न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघाला ४० दिवसांची विश्रांती मिळणार आहे. त्यांनतर भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. सुंदरने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
भारतीय संघात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची जोडी असताना सुंदरला संघात स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे. सुंदरने आतापर्यंत एकूण ४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ६६.२ च्या सरासरीने २६५ धावा करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ३ अर्धशतक देखील झळकावले आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याच्या नावे ६ विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशीप फायनल: जडेजा की अश्विन, कोण असेल भारतीय संघाचा विघ्नहर्ता?
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कधीही शुन्यावर बाद न झालेले दोन भारतीय क्रिकेटपटू
सध्याच्या भारतीय संघातील ३ गोलंदाज, ज्यांनी विलियम्सनला कसोटीत केले सर्वाधिकवेळा बाद