भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारपासून (१८ ऑगस्ट) झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. ही मालिका सुरू व्हायला २ दिवस बाकी असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा खांद्याच्या दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. दीर्घ काळातून झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले होते. परंतु पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्याला सामना खेळण्याआधीच बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असेल.
सुंदर (Washington Sundar) जवळपास एक वर्षापासून वेगवेगळ्या समस्यांमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्याला जानेवारीत कोरोनाची लागण झाली होती. याच कारणामुळे तो संघातून बाहेर झाला होता. यानंतर त्याला दुखापत झाली होती, ज्यातून तो बरा झाला आणि काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. येथे त्याने त्याच्या फिटनेस आणि फॉर्मला सिद्ध केले होते. परंतु स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली आणि तो अर्ध्यातूनच काउंटी क्रिकेटमधून बाहेर झाला होता.
दुखापतीचे ग्रहण मागे (Wasington Sundar Injury) लागलेल्या सुंदरबद्दल वृत्तसंस्था पीटीआयला माहिती देताना बीसीसीआय अधिकारी म्हणाले की, “हो. वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून (India Tour Of Zimbabwe) बाहेर झाला आहे. त्याला ओल्ड ट्रॅफर्ड येथे लंकाशायर विरुद्ध वॉरस्टरशायर संघादरम्यान झालेल्या रॉयल लंडन वनडे चषकात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्याला डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आता तो या दुखापतीतून बरा होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रम करेल.”
असे असले तरीही, सुंदर झिम्बाब्वेविरुद्धच्या दौऱ्यातून बाहेर झाल्यास, त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून कोणाला पाठवले जाईल की नाही?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
दरम्यान आशिया चषक २०२२ पूर्वी भारतीय संघाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असेल. या मालिकेतील सामने अनुक्रमे १८ ऑगस्ट, २० ऑगस्ट आणि २२ ऑगस्ट रोजी खेळले जातील. हे सर्व सामने हरारेच्या हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होतील.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
राहुलचं टेन्शन वाढलंय! स्टार अष्टपैलू खेळडू थेट मालिकेतून होणार बाहेर
दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या वार्षिक पुरस्कारांत भारतीयांची बाजी; वाचा संपूर्ण यादी