भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा सातत्याने दुखापतग्रस्त होत असतो. आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळत असताना तो दुखापतीमुळे हंगामाच्या मध्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने त्या दुखापतीतून सावरत, इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुनरागमन केले होते. आता जेमतेम चारच सामने खेळले असताना, तो पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी तो अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर सुंदर याने इंग्लंडमधील काउंटी क्लब लॅंकेशायरशी करार केला होता. त्याने सुरुवातीला संघासाठी दोन प्रथमश्रेणी सामने खेळले. यामध्ये त्याच्या बॅटमधून ५२ धावा आल्या होत्या. तसेच, ८ बळी मिळवण्यातही त्याला यश आलेले. सध्या तो लॅंकेशायरसाठी इंग्लंडमधील प्रमुख देशांतर्गत वनडे स्पर्धा खेळतोय. यातील पहिल्या दोन सामन्यात तीन बळी मिळवण्यात तो यशस्वी ठरला होता.
🤕 @Sundarwashi5 has left the field after receiving treatment on his left shoulder following a heavy landing.
No breakthroughs with the ball just yet.
27-0 (8)
🌹 #RedRoseTogether pic.twitter.com/IRODWuDEF5
— Lancashire Cricket (@lancscricket) August 10, 2022
बुधवारी (१० ऑगस्ट) वॉर्सेस्टरशायरविरुद्धच्या खेळत असताना सुंदर क्षेत्ररक्षणादरम्यान डाव्या खांद्यावर पडला. त्यामुळे त्याला तात्काळ मैदानाबाहेर जावे लागले. तोपर्यंत सुंदरने आपल्या ८ षटकात २७ धावा दिल्या होत्या. मात्र, त्याला बळी मिळवण्यात अपयश आलेले. लॅंकेशायर संघाने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
सुंदरची या महिन्यात होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. भारतीय संघाला या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मात्र, तो या दुखापतीतून सावरला नाही तर, त्याला दौऱ्यावर जाता येणार नाही. मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळला जाईल. सुंदरने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी चार वनडे व चार कसोटी सामने खेळले आहेत. तर, ३१ टी२० सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आता मेंटर म्हणून दिसणार धोनी? सीएसके नव्हेतर या संघासाठी निभावणार जबाबदारी
पंडित महेंद्रसिंग धोनी! सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय थालाचा नवा लूक
आता ‘या’ लीगमध्येही होणार खेळाडूंचा लिलाव; वाचून घ्या काय आहेत ‘ऑक्शन रूल्स’