भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यापूर्वीच मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने हा सामना 90 धावांनी आपल्या नावे करत पाहुण्या न्यूझीलंड संघाला क्लीन स्वीप केले. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शतकी खेळी केली. जवळपास तीन वर्षानंतर आलेल्या या शतकामुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याचा देखील समावेश आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघाला उत्कृष्ट सुरूवात देत असलेल्या रोहितला अर्धशतकाचे रूपांतर शतकात करण्यात अपयश येत होते. मात्र, होळकर स्टेडियमवर त्याने ती कसर देखील भरून काढली. त्याने आपले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 83 चेंडू घेतले. यामध्ये 9 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. शतकानंतर मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. 85 चेंडूवर 101 धावांवर तो माघारी परतला. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 30 वे शतक ठरले. तसेच, तो 1100 दिवसांनी वनडे शतक झळकावण्यात यशस्वी ठरला.
त्याच्या याच खेळानंतर प्रतिक्रिया देताना जाफर म्हणाला,
“रोहित या सामन्यात बिलकुल जुन्या अंदाजात खेळताना दिसला. वनडे क्रिकेटमध्ये तुम्हाला इतकी आक्रमक सुरुवात मिळत असेल तर, नक्कीच त्याचा संघाला फायदा होतो. रोहित अनेक दिवसांपासून चांगल्या लयीमध्ये दिसत होता. फक्त त्याचे हे शतक बाकी होते.”
जाफरने याच मुलाखतीत शार्दुल ठाकूर हा वनडे संघात तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून जागा बनवू शकतो असे देखील म्हटले. सध्या त्याचा फॉर्म चांगला असून, त्याला सातत्याने खेळवल्यास संघाला फायदा होईल असे जाफर म्हणाला.
(Wasim Jaffer Said He Batted Like Vintage Rohit)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: सूर्या बनला 2022 आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द इयर; तीन दिग्गजांना मागे टाकत उमटवली मोहोर
BREAKING: आणखी एक आयसीसी पुरस्कार भारतात! रेणुका ठाकूर ठरली एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर