fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

Video: मैदानावर ठेका धरणाऱ्या शिखर धवनने भज्जीलाही केले भांगडा करण्यास प्रोत्साहित

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाचवा कसोटी सामना ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (7 सप्टेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने मैदानातच भांगडा नृत्य करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

त्याच्या या भांगडा नृत्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की शिखर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षक त्याचे नाव घेत त्याला प्रोत्साहन देत होते. याचवेळी तिथे ढोलही वाजत होता. त्यामुळे त्या ढोलच्या आवाजावर शिखरने भांगडा नृत्य केले.

शिखरने हे नृत्य पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात केले. त्याचे हे भांगडाचे ठेके पाहुन समालोचन करणारा भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि डेव्हिड लॉइड यांनीही कॉमेंट्री बॉक्समध्ये(समालोचन कक्ष) भांगडा नृत्याचा ठेका धरला.

याचा व्हिडिओ हरभजनने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन दिले आहे की “जेव्हा काम मजेशीर बनते. डेव्हिड लॉइड यांना थोडा भांगडा शिकवला. त्यांनीही त्यांच्या शैलीने भांगडा केला. हा खूप चांगला प्रयत्न होता. अशा दिग्गजांबरोबर काम करायला नेहमी मजा येते. त्यांच्याकडून खूप शिकलो आहे.”

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात पहिल्या दिवसाखेर 7 बाद 198 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून अॅलिस्टर कूक आणि मोईन अलीने अर्धशतक केले. तर भारताकडून इशांत शर्माने 3, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम

एबी डिविलियर्स खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये!

का झाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी सारासाठी भावूक?

You might also like