fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ

हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत भारताला २-१ असे पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला केवळ ४ धावांनी पराभूत व्हावे लागले. 

यामुळे प्रथमच टीम इंडियाला दुहेरी तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजीच्या आघाडीवर संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाला या मालिकेत पराभव पहावा लागला.

असे असले तरी काल टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक चांगली घटना पहायला मिळाली. जेव्हा भारतीय संघाची गोलंदाजी सुरु होती तेव्हा एक धोनी चाहता थेट मैदानात आला. या चाहत्याच्या हातात भारताचा तिरंगाही होता.

जेव्हा हा चाहता धोनीच्या पायांना स्पर्श करत होता तेव्हा त्याच्या हातातील तिरंगा जमीनीला टेकणार होता. परंतु प्रसंगावधान राखत धोनीने लगेच तो ध्वज आपल्या हातात घेतला. तसेच यावेळी पुर्णपणे शांत असलेला दिसला.

हा धोनीचा ३००वा ट्वेंटी-ट्वेंटी सामना होता. अशी कामगिरी करणारा तो आशिया खंडातील तिसरा तर भारतातील पहिलाच खेळाडू होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा

धोनी जादू! हातात बॅटही न घेतलेल्या धोनीच्या नावावर तिसऱ्या टी२० सामन्यात विक्रमांचा विक्रम

You might also like