Virat Kohli On Nandre Burger: विराट कोहली याला मैदानावरील स्पर्धा आवडते आणि त्यामुळे त्याला आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास मदत होते, विशेषत: फलंदाजी करताना. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज नांद्रे बर्गर याने थ्रो करून विराट कोहलीला घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु माजी भारतीय कर्णधार त्याच्याकडे नजर पाहत होता.
भारताच्या पहिल्या डावातील 15 व्या षटकात ही घटना घडली. नांद्रे बर्गर (Nandre Burger) याने चेंडू मिडल स्टंपवर टाकला, ज्याचा विराट कोहली (Virat kohli) याने बचाव केला. यानंतर वेगवान गोलंदाजाने चेंडू पकडला आणि चेंडू फलंदाजाच्या दिशेने विकेटवर मारला. यादरम्यान कोहलीही नांद्रेकडे बघताना दिसला. या त्याच्या अंदाजावर चादत्यांनी जोरजोरात ओरडायला सुरूवात केली जे पाहून विराटही हसू लागला. मात्र, यानंतर कोहलीने काही उत्कृष्ट शॉट्स खेळले.
Face and After scenes of #ViratKohli and Burger’s face off
Commentry is enough to describe the greatness🤩🫠#INDvsSA #WTC25 #crickettwitter #CapeTownTest #RohitSharma #Siraj #ShubmanGill #KLRahul #JaspritBumrah #BCCI #TeamIndia #INDvsAFG #TestCricket #RavindraJadeja #ShreyasIyer pic.twitter.com/0ZV6FYu76Y— Anmol Narang (@Anmol_Narang_) January 3, 2024
नांद्रे बर्गरने दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या कसोटी सामन्यात चेंडूने शानदार प्रदर्शन केले होते आणि सात विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामध्ये यजमान संघाने भारतावर एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यातही बर्गरने आपली लय कायम ठेवत टीम इंडियाच्या पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या प्रोटीज संघाची अवस्था 55 धावांवर सर्वबाद झाली. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद सिराज याने सहा विकेट्स घेतल्या. तर पहिल्या डावात भारतीय संघ 153 धावा करून सर्वबाद झाला आणि भारतीय संघाला 98 धावांची आघाडी मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत प्रोटीज संघाने दुसऱ्या डावात 3 विकेट्स गमावून 62 धावा केल्या होत्या आणि अजूनही भारतापेक्षा 36 धावा मागे आहेत. एडम मार्करम (36) आणि डेव्हिड बेडिंगहॅम (7) धावांवर खेळत आहेत. (IND vs SA Nandre Berger takes a break with Virat; Kohli gave the answer in his own style watch the video)
हेही वाचा
रोहितमुळे शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागते, खुद्द कर्णधारानेच केला खुलासा
ICCने केली ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’साठी खेळाडूंची घोषणा, भारताच्या ‘या’ स्फोटक सलामीवीराचाही समावेश