---Advertisement---

सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2020 10:13 AM
---Advertisement---

सनरायजर्स हैदराबाद (एसआरएच) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आयपीएल 2020 चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट, स्टेडियमवर खेळला गेला. उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबी संघाने हा सामना 10 धावांनी जिंकला आणि सामना जिंकल्यामुळे आरसीबी संघाने गुणतालिकेत 2 महत्त्वाचे गुण मिळवले आहेत.

फिरकीपटू राशिद खानला झाली दुखापत

आरसीबीचा वेगवान गोलंदाज शिवम दुबे 17 वे षटक फेकत होता. या षटकाच्या सहाव्या चेंडूवर युवा फलंदाज अभिषेक शर्माने फटका मारला, नॉन-स्ट्राईकर एन्डवर उभा असलेलला फलंदाज राशिद खान आणि अभिषेकला या फटक्यावर 2 धावा घ्यायच्या होत्या. त्यांनी पहिली धाव पूर्ण केली. पण जेव्हा दुसऱ्या धावेसाठी ते धावत होते, तेव्हा राशिद खान अभिषेक शर्माला जाऊन धडकला आणि तो जमिनीवर पडला. त्याला दुखापत झाली होती. यामुळे अभिषेक शर्माही धावबाद झाला होता.

आयपीएलच्या या हंगामातून होऊ शकतो बाहेर

राशिद खानच्या दुखापतीमुळे पंचांना बराच काळ खेळ थांबवावा लागला होता. तथापि, राशिद खानला सनरायझर्सची कठीण परिस्थिती पाहून दुखापतीमुळे बाहेर होण्याऐवजी खेळणे योग्य वाटले होते. तो दुखापतीत खेळला. परंतु त्याला काही खास करता आले नाही आणि 5 चेंडूत 6 धावा केल्यावर तो बाद झाला होता.

त्याची दुखापत खूप गंभीर दिसत आहे, त्यामुळे तो आयपीएल 2020 मधून बाहेर होऊ शकतो. तथापि, असे झाल्यास सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असेल.

सनरायझर्सचा अष्टपैलू अभिषेक शर्माला धडकल्यानंतर राशिद खान कसा जखमी झाला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mscsk7/status/1308098960041541632

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---