---Advertisement---

ऑल इज वेल! कर्णधारपदाच्या निर्णयानंतर खटके उडण्याऐवजी हार्दिकची सूर्यकुमारला ‘जादू की झप्पी’

hardik suryakumar hug
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ आगामी टी20 मालिकेसाठी श्रीलंकेत असून खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 27 जुलैपासून टी20 मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दौऱ्यावर भारतीय टी20 संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तर कर्णधारपदाचा दावेदार असलेला अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेला दिसेल. अशा स्थितीत या मालिकेदरम्यान सूर्यकुमार आणि हार्दिक यांच्यात खटके उडताना दिसतील, असे वाटत होते. सोशल मीडियावरही याबाबत वातावरण तयार केले जात होते. पण प्रत्यक्षात याउलट चित्र पाहायला मिळाले आहे.

सूर्या आणि हार्दिकने मिठी मारली
बीसीसीआयने श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हार्दिक कोलंबोला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर सूर्यकुमारला मिठी मारताना दिसले आहेत. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना होण्यासाठी भारताच्या टी20 संघाचे सदस्य सोमवारी (22 जुलै) दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमले होते. यावेळी सूर्यकुमार आणि हार्दिक एकमेकांना मिठी मारताना कॅमेरात कैद झाले.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार खुर्चीवर बसलेला दिसतोय आणि हार्दिक त्याच्याकडे चालत जातो. हार्दिकला येताना पाहून सूर्यकुमार लगेच उठतो आणि हार्दिकला मिठी मारतो. यावेळी 33 वर्षीय सूर्यकुमारची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तो
खूप आनंदी दिसत होता. त्याचवेळी जवळच उभा असलेला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हार्दिक आणि सूर्यकुमारला एकमेकांना मिठी मारताना पाहून हसताना दिसला.

दरम्यान हार्दिक आणि सूर्यकुमार हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सहकारीही आहेत. दोघेही मुंबई इंडियन्सकडून खेळतात. 30 वर्षीय हार्दिक मुंबई इंडियन्सचा विद्यमान कर्णधार आहे. तर सूर्यकुमार आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळतो.

महत्वाच्या बातम्या-

“एक दिवस शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल”, माजी फलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळाला नवा अध्यक्ष,संजय नाईक यांचा दारुण पराभव
आयसीसीचा युएसए संघावर कारवाईचा बडगा, 12 महिन्यांसाठी टीमला केले निलंबित; कारण काय?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---