भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याला त्याच्या आक्रमक अंदाजासाठी ओळखले जाते. तो बऱ्याचदा मैदानावर आक्रमक भूमिकेत दिसला आहे. परंतु मागील काही काळापासून तो जरा शांत दिसून आला होता. सध्या भारतातील पुणे आणि मुंबईच्या स्टेडियमवर आयपीएल २०२२चे सामने खेळवले जात आहेत. यातील २७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा चाहत्यांना विराटचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
दिल्लीचा विस्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याला बाद झाल्यानंतर विराटने (Virat Kohli) आक्रमक सेलिब्रेशन (Virat Kohli Aggressive Celebration) केले आहे. जे पाहून आरसीबीचे चाहते मात्र भलतेच आनंदी आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आरसीबीच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून सलामीवीर वॉर्नरने झंझावाती खेळी खेळली. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६६ धावा फटकावल्या. मात्र डावातील १२ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फिरकीपटू वानिंद हसरंगाने त्याला पायचित केले. सुरुवातीला पंचांनी वॉर्नरला नाबाद घोषित केले होते. परंतु आरसीबीने रिव्ह्यू घेतल्यानंतर दिसून आले की, वॉर्नर हसरंगाच्या गोलंदाजीवर स्विच हिट खेळण्याच्या प्रयत्नात होता. परंतु त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू त्याच्या पॅडवर जाऊन लागला.
You all are not getting it, as Virat Kohli said 2016 ipl final lose was a heartbreak for him and it was Warner leading SRH who defeated RCB so maybe that frustration came out yesterday……..???????? https://t.co/Nh13uIt9mc
— Bardi C (@shyhoonbae) April 17, 2022
परिणामी पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. वॉर्नर बाद झाल्याचे पाहून विराटला मात्र भलताच आनंद झाला. त्याने वॉर्नरजवळ जाऊन त्याच्या विकेटचे सेलिब्रेशन साजरे केले. परंतु वॉर्नरने त्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे मैदानाबाहेर निघून गेला. मात्र विराटला पुन्हा एकदा आक्रमक रूपात पाहून चाहते सुखावले आहेत. जुना विराट परत (Old Virat Kohli) आल्याचा आनंद त्यांच्या गगनात मावेनासा झाला आहे.
Virat Kohli's reaction when Wanindu Hasaranga picked David Warner's wicket. pic.twitter.com/fYOfE1cMNM
— Sport Enthusiast (@frolic_waseem) April 17, 2022
What was that celebration for? Ipl 2022 finals done? Was Virat Kohli that bowler who took warner's wicket? Why that aggression, Virat Kohli is not even captain!! Do anyone tell me? ???? pic.twitter.com/B9AkueGdz8
— Bardi C (@shyhoonbae) April 17, 2022
Hasaranga gets David Warner and Virat Kohli giving him a send off. That aggression,so good to see him as he was always. ???? pic.twitter.com/gurJEIk2yb
— Akshat (@AkshatOM10) April 16, 2022
विराटने घेतला रिषभचा लई भारी झेल
या सामन्यादरम्यान विराटने दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याचा एक अद्भुत झेलही घेतला. बेंगलोरकडून १७वे षटक मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) टाकत होता. यावेळी खेळपट्टीवर स्ट्राईकला पंत होता. पंतने सिराजचा पहिला चेंडू खेळला आणि त्यावर २ धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचला. मात्र, तिसरा चेंडू त्याने कव्हरच्या दिशेने मारला. फुलटॉस आलेला हा चेंडू पंतने मारताच तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) उडी मारून एकहाती झेल घेतला. हा झेल घेण्यासाठी त्याने हवेत उंचच्या उंच उडी मारली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा
ग्राउंड्समनच्या मुलाला जेव्हा धोनीने दिला मोलाचा सल्ला, ‘ऑफ स्पिनर्सला टी२० मध्ये सर्वच मारतात, पण…’
भारताच्या माजी प्रशिक्षकाला आहे विश्वास, यंदा आयपीएलला मिळणार नवा चँपियन; पाहा कोणावर लावलाय दाव