वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप (३-०) दिला. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (१२ जून) मुलताना मध्ये खेळला गेला. पाकिस्तानने पहिले दोन सामने जिंकून आधीच विजयी आघाडी घेतली होती, पण रविवारी शेवटचा सामना देखील त्यांनी ५३ धावांनी जिंकला. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरन संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत असतो, पण या सामन्यात त्याने गोलंदाजी देखील केली.
पाकिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. त्यांची सलामीवीर जोडी फखर जमान (Fakhar Zaman) आणि इमाम उल हक (Imam-ul-Haq) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. वेस्ट इंडीजसाठी मालिकेतील या शेवटच्या सामन्यात शाई होपने यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडल्यामुळे कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) क्षेत्ररक्षण करताना दिसला. डावाच्या १३ व्या षटकात पूरनने स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्याच्या आधी पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त ३ चेंडू टाकले होते, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक षटक टाकले होते. पण या सामन्यात मात्र त्याने गोलंदाजीमध्ये कहर केला. पूरनने पाकिस्तानविरुद्ध टाकेलल्या पहिल्या २ षटकांमध्ये १३ धावा खर्च केल्या, पण तिसऱ्या षटकात त्याला मोठी विकेट मिळाली. षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने फखर जमानला क्लीन बोल्ड केले. पहिल्या विकेटसाठी फखर आणि इमाम यांच्यात ८५ धावांची भागादीर झाली होती.
त्यानंतर स्वतःच्या कोट्यामधील सहाव्या षटकात पूरनच्या गळाला दोन मोठ्या विकेट्स लागल्या. खेळपट्टीवर सेट झालेला इमाम उल हक त्याच्या एका चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू हवेत उंच उडाला आणि यष्टीरक्षाने त्याचा झेल घेत बाद केले. इमामने या सामन्यात वैयक्तिक ६२ धावांची खेळी केली. पुढच्या दोन चेंडूंनंतर पूरनने मोहम्मद हारिसला बाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान देखील पूरनच्याच चेंडूवर बाद झाला. रिजवानने २१ चेंडूत ११ धावा केल्या आणि विकेट गमावली.
दरम्यान, पूरन या मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज बनला. त्याने टाकलेल्या १० षटकांमध्ये ४८ धावा खर्च केल्या आणि ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त अकील हुसैनने देखील मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्याने ५२ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या होत्या, जे या मालिकेतील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रेयसने ४० धावा केल्या अन् युवराजचा विक्रम मोडीत काढला, वाचा काय आहे विक्रम
दुसऱ्या सामन्यांत बाद होताच ऋतूराजवर मीम्सचा वर्षाव, पाहा चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया
सामना हातात असताना ‘इथे’ झाली चूक, नाहीतर विजय आमचाच होता; रिषभ पंतची प्रतिक्रिया